
अंबाजोगाई -:जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त येथील
स्वा.रा. ती.रुग्णालयात मेडीसिन विभागाच्या वतीने आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले होते.यावेळी ८० ज्येष्ठ नागरिकांची आरोग्य तपासणी व उपचार करण्यात आले.
या शिबिराचे उद्घाटन अधिष्ठाता डॉ.शंकर धपाटे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी संयोजक मेडीसिन विभागाचे प्रमुख डॉ.सिध्देश्वर बिराजदार,ज्येष्ठ नागरिक संघाचे डॉ.सुलभा खेडगीकर,लक्ष्मणराव गोरे यांची उपस्थिती होती.
या वेळी डॉ.सिध्देश्वर बिराजदार यांनी सांगितले की रुग्णालयात ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्र कक्ष स्थापन करण्यात आला आहे. ज्येष्ठांच्या आरोग्यस्मस्स्या, त्यांचे आजार याबाबत उपचार सुरू आहेत. ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्र निवासी उपचार व्यवस्था करण्यासाठी वॉर्ड स्थापन करावा.अशी मागणी त्यांनी अधिष्ठाता यांच्याकडे केली. यावेळी याबाबत पाठपुरावा करून स्वतंत्र विभाग उभारणार असल्याचे डॉ. धपाटे यांनी सांगितले. यावेळी ज्येष्ठ नागरिकांची रक्तदाब, मधुमेह, इसीजी तपासणी करण्यात आली. तसेच गरजू रुग्णांनावर उपचार करण्यात आले. यावेळी ज्येष्ठ नागरिक संघाचे पदाधिकारी उपस्थित होते.
