तालुकास्तरीय क्रिकेट स्पर्धेत खोलेश्वर माध्यमिक विद्यालयाचा संघ प्रथम
(तालुकास्तरीय शालेय क्रिकेट स्पर्धेत संघ तालुक्यात प्रथम)

अंबाजोगाई (प्रतिनिधी) :- येथील खोलेश्वर माध्यमिक विद्यालयाचा १४ वर्षवयोगटातील विद्यार्थ्यांच्या संघाने तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. सदरील स्पर्धा दि.
३०/९/२४ रोजी तालुका क्रीडा संकुल,
अंबाजोगाई येथे पार पडली आहे.सदरील स्पर्धा तालुका क्रीडा परिषदेच्या वतीने आयोजित करण्यात आली होती.या
विद्यार्थ्यांना क्रीडा शिक्षक सतीश बलुतकर,
विष्णू कुकर यांनी मार्गदर्शन केले आहे.
विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल त्यांचे अभिनंदन भा.शि.प्र.संस्थेचे अध्यक्ष डॉ.सुरेंद्र आलुरकर,
कार्यवाह डॉ.हेमंत वैद्य,मुख्य प्रशासकीय अधिकारी चंद्रकांत मुळे,स्थानिक समन्वय समितीचे अध्यक्ष विजय वालवडकर,
स्थानिक समन्वय समितीचे कार्यवाह किरण कोदरकर,माध्यमिक शालेय समितीचे अध्यक्ष डॉ.अतुल देशपांडे,मुख्याध्यापक तथा केंद्रीय कार्यकारिणी सदस्य बाबुराव आडे,शालेय समितीचे सर्व सदस्य,
उपमुख्याध्यापक माधव जोशी,
पर्यवेक्षक सुर्यकांत उजगरे,पर्यवेक्षक प्रशांत पिंपळे तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले आहे.
