अंबाजोगाईत संवाद हृदय रोगाशी कार्यक्रमाचे आयोजन
सामाजिक दायित्व जोपासत जनजागृती व मार्गदर्शनः डॉ. नवनाथ घुगे

अंबाजोगाई-: जागतिक हृदय दिनाच्या निमित्ताने घुगे हॉर्ट अॅन्ड क्रिटिकल केअर हॉस्पिटल, रोटरी क्लब ऑफ अंबाजोगाई सिटी व इंडियन मेडिकल असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने संवाद हृदयरोगाशी व सी.पी.आर प्रात्यक्षिक कार्यक्रम रविवार ६ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५ वाजता आध्यकवी मुकुंदराज सांस्कृतिक सभागृहात आयोजित करण्यात आल्याची माहीती डॉ. नवनाथ घुगे यांनी दिली.
जागतिक हृदय दिनाच्या नमित्ताने एक सामाजिक व जनजागृतीचा उपक्रम घेण्यात येणार आहे. जागतिक हृदय दिनाच्या निमीत्ताने हार्ट अॅटक, अचानक होणारे मृत्यू व त्यांची
कारणे, उपाय व आपत्कालीन परिस्थितीमध्ये करावयाचे उपचार व सी.पी.आर. याबद्दल मार्गदर्शन करण्यासाठी लातूर येथील हदयरोग तज्ञ डॉ. संजयकुमार शिवपुजे मार्गदर्शन करणार आहेत. या प्रसंगी पी.डी.जी. रोटरी क्लब, रोगप्रतिबंध आणि उपचार विभागाचे सल्लागार हरिष मोटवाणी उपस्थित राहाणार आहेत. सध्याची धावपळीची जीवनशैली, ताण तणाव, चुकीची आहार पद्धती, व्यसन, धुम्रपान यामुळे कमी वयात रक्तदाब, मधुमेह, अति कोलोस्टॉल या सर्व गोष्टीमुळे हार्ट अॅटक येण्याचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. हार्ट अटॅक व संबंधित आजारामुळे दर वर्षी जगामध्ये जवळपास दीड ते दोन करोड लोक मृत्यूमुखी पडतात.
त्यातील ६५ टक्के मृत्यू हे रुग्णालयात पोहचण्या आधीच होतात.हृदय रोगाबद्दल व्यापक स्वरूपात जनजागृती करण्याच्या उद्देशाने व सामाजिक दायित्व जोपासत योग्य वेळी योग्य मार्गदर्शन केल्यामुळे आपण एखाद्याचा जीव वाचवू शकतो किंवा त्यावर प्रतिबंध करू शकतो यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. मोठ्या संख्येने या कार्यक्रमासाठी उपस्थित रहावे, असे आवाहन आयोजक डॉ. नवनाथ घुगे, रोटरीचे अध्यक्ष कल्याण काळे, सचिव धनराज सोळंकी, रोटरी व आयएमएचे पदाधिकारी यांनी केले आहे.
