परळी मतदार संघात राजेसाहेब देशमुखांच्या नावाची चर्चा

परळी -: धनंजय मुंडे यांना तगडे आव्हान देण्यासाठी मनोज जरांगे यांच्या पाटील यांच्या आंदोलनातील सक्रिय कार्यकर्ते तथा बीड जिल्हा काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजेसाहेब देशमुख यांच्या नावाची जोरदार चर्चा मतदार संघात सुरू आहे.
शरद पवारांच्या वतीनेही तशी चाचपणी सुरू आहे.
संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष वेधून घेणारा मतदार संघ म्हणून परळी मतदार संघाकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. की बीड चे पालकमंत्री धनंजय मुंडें समोर कोणता तगडा उमेदवार तुल्यबळ राहील.याचा शोध जेष्ठ नेते शरद पवार यांच्या कडून सुरू आहे. पवारांनी दोन महिन्यांपासून धनंजय मुंडे यांच्या विरोधकांची एकत्रित मोट बांधण्याचे काम केले आहे. तसेच महाविकास आघाडीतील सर्वच पक्षांचे पदाधिकारी ही सातत्याने शरद पवारांच्या संपर्कात आहेत. या मतदार संघात धनंजय मुंडे समोर तगडे आव्हान कोण निर्माण करू शकतो? आपल्या पक्षाकडून निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारास मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचा
कसा फायदा होईल.याचाही विचार पवार यांच्या कडून सुरू आहे. त्याच धर्तीवर काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजेसाहेब देशमुख यांच्या नावाची चाचपणी पवारांकडून सुरू असल्याचे समजते. राजेसाहेब देशमुख हे बीड जिल्हा परिषदेचे शिक्षण व आरोग्य सभापती होते. पंचायत समिती सभापती,बाजार समिती,साखर कारखान्याचे संचालक म्हणूनही त्यांना निवडणूक लढविण्याचा अनुभव आहे. ते सद्या जिल्हा परिषद सदस्य असलेला गट परळी मतदार संघात आहे. याशिवाय त्यांचे सगे सोयरे व गणगोत मोठ्या संख्येने या मतदार संघात असल्याचा फायदा त्यांच्या उमेदवारीला होऊ शकतो. तर दुसरीकडे पवारांनी राजाभाऊ फड यांच्या प्रवेशाने या मतदार संघात मजबूत ताकद निर्माण केली आहे. याशिवाय सुदामती गुट्टे,ॲड. माधव जाधव, फुलचंद कराड, असे अनेक जण इच्छुक आहेत. मात्र तगडा उमेदवार कोण राहील? याचाच शोध पवारांकडून सुरू आहे.