दुर्गप्रेमी मंडळाच्या किल्ला बांधा स्पर्धेचे बक्षीस वितरण

अंबाजोगाई (प्रतिनिधी)
दुर्गप्रेमी मंडळाच्या वतीने झालेल्या किल्ला बांधा स्पर्धेचे पारितोषिक वितरण नुकतेच संपन्न झाले यात प्रथम पारितोषिक आरूषी गायकवाड, लोहगड, द्वितीय पारितोषिक समृद्धी लोखंडे, मुरूड जंजिरा तृतीय पारितोषिक श्वेता तट, सिंधुदुर्ग तर उत्तेजनार्थ पारितोषिक प्रतिक जाधव, तोरणा, कार्तिक दरगड,शिवनेरी रूपाली पवळे,पद्मदुर्ग माया सौंदडे, मुरुड जंजिरा, पार्थ पांचाळ, रायगड प्रोत्साहनपर प्रशांत मेढे, आदित्य रावळ यांनाही प्रदान करण्यात आले अध्यक्षस्थानी जेष्ठ विधिज्ञ शिवाजी कऱ्हाड, होते.व्यासपीठावर अक्षय मुदंडा, नायब तहसिलदार मिलींद गायकवाड,भागवत मस्ने,अनंतराव देशपांडे,सुधीर धर्माधिकारी, बालाजी शेरेकर, भागवत आचार्य,आदी उपस्थित होते.
मान्यवर पाहुण्यांनी यांनी मनोगत व्यक्त केले. विधिज्ञ कऱ्हाड यांनी अध्यक्षीय समारोप केला प्रास्ताविक व आभार प्रदर्शन दुर्गप्रेमी मंडळाचे अध्यक्ष मिलींद कुलकर्णी यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिल्पा सेलुकर,सविता देशमुख वैष्णवी राठोड,वैभवी पाटील,शुभम नर्के, सर्वजित कुलकर्णी, बकिराम पुरी,
अभय जोशी शिवम आढाव,गोविंद उंबरे,बालाजी केंद्रे, योगेश स्वामी यांच्या सह इतरांनी परिश्रम घेतले.