“मैं हूँ स्वयं सिद्धा” पुरस्काराने सुनंदा मुंदडा. सन्मानित
बीड़ जिल्हा माहेश्वरी संघटन यांच्या वतीने झाला सन्मान

अंबाजोगाई -:
बीड़ जिल्हा माहेश्वरी संघटन यांच्या वतीने दिला जाणारा
मैं हूँ स्वयं सिद्धा” हा पुरस्कार येथील वसुंधरा महिला नागरी सहकारी बँकेच्या अध्यक्षा सुनंदा मुंदडा यांना प्रदान करण्यात आला.शाल,श्रीफळ,स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप होते.
या कार्यक्रमासाठी प्रदेश माहेश्वरी महिला संघटनच्या अध्यक्षा सुनिता पल्लोड, बीड जिल्हा अध्यक्ष ललित तोष्णीवाल, सचिव जगदीश जाजू, बीड जिल्हा माहेश्वरी महिला अध्यक्ष पूनमजी जाजू , महाराष्ट्र माहेश्वरी महिला संघटनच्या विविध पदाधिकारी व बीड जिल्ह्य़ातील माहेश्वरी संघटनाच्या विविध पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.त्यांना मिळालेल्या या पुरस्कारा बद्दल त्यांचे सर्वत्र स्वागत होत आहे.
अपंगत्वावर मात करून केले केतृत्व सिद्ध – :
एखाद्याची चूक एखाद्याचे जीवन उद्ध्वस्त करून टाकते. त्यातलाच हा प्रकार आहे. सुनंदा मुंदडा यांना लहानपणी चुकीची इंजेक्शन दिल्यामुळे रिऍक्शन येऊन एक पाय निकामी झाला. आणि त्यांच्यावर कृत्रिम अपंगत्व ओढवले. मात्र त्यांनी स्वकर्तृत्वाने अपंगत्वावर मात केली. व संघर्षमय जीवनातून खंबीर उभ्या राहिल्या. सामाजिक,शैक्षणिक व सहकार क्षेत्रात त्यांनी उल्लेखनीय कार्य केलेले आहे.