विधानसभा उमेदवारीसाठी काँग्रेस पक्षाच्या अंबाजोगाईत झाल्या मुलाखती
तेरा उमेदवार इच्छुक, राजेसाहेब देशमुख यांनीही दिल्या मुलाखत

अंबाजोगाई – बीड जिल्ह्यातील सहा मतदार संघासाठी काँग्रेस पक्षाच्या वतीने गुरूवारी दुपारी काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष आ.रामहरी रूपनर यांनी बीड जिल्ह्याचे निरिक्षक म्हणून उमेदवार्यांच्या मुलाखती घेतल्या. यावेळी विविध मतदार संघातून १३ जणांनी मुलाखती दिल्या. यात प्रामुख्याने काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजेसाहेब देशमुख यांनी परळी मधून उमेदवारी मागीतली आहे. बीड जिल्ह्यात बीड, केज व परळी हे तीन मतदार संघ महाविकास आघाडी काँग्रेस पक्षासाठी मागीतले आहेत. असे काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष आ.रामहरी रूपनर यांनी सांगितले.
बीड व लातूर जिल्ह्यासाठी काँग्रेस पक्षाच्या वतीने निरिक्षक म्हणून प्रदेश उपाध्यक्ष आ.रामहरी रूपनर हे इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेत आहेत. बीड जिल्ह्यासाठी गुरूवार अंबाजोगाई येथील काँग्रेस पक्षाच्या जिल्हा कार्यालयात या मुलाखती झाल्या. बीड जिल्ह्यात बीड, परळी व केज हे तीन मतदार संघ काँग्रेस पक्षाने
मागीतले आहेत. या तीनही ठिकाणच्या जागा निवडून येण्याची क्षमता असणारे तुल्यबळ उमेदवार पक्षाकडे आहेत. त्यामुळे महाविकास आघाडी हे तीन्ही मतदार संघ काँग्रेसकडे राहणार आहेत. असे आ.रूपनर यांनी सांगितले. महाविकास आघाडी सध्या काँग्रेस पक्ष प्रबळ आहे. काँग्रेस पक्षाचा जनाधार वाढत चालला आहे. राज्यात 288 मतदार संघ काँग्रेस पक्षाने मुलाखती घेतल्या आहेत असे त्यांनी सांगितले.
यांनी मागीतली उमेदवारी
बीड- डॉ.दिलीप मोठे, परळी – राजेसाहेब देशमुख, वसंत मुंडे, अॅड.अनिल मुंडे, केज-अॅड.अनंतराव जगतकर, नितीन हत्तीअंबीरे, राहूल व्हावळे, दत्ता कांबळे, रविंद्र दळवी, अॅड.मारूती सावळकर, गेवराई – मनोहर चाळक, आष्टी – छगन पाटील, रविंद्र ढोबळे, तर माजलगाव या मतदार संघातून मुलाखतीसाठी एकही उमेदवार आला नाही.