
आंबाजोगाई-
आंतरभारतीचे आजीव सदस्य शरद लंगे यांना 2024चा आदर्श कार्यकर्ता पुरस्कार घोषित करण्यात आला आहे.
या पुरस्काराचे वितरण 15 ऑक्टोबर रोजी महात्मा गांधींच्या जीवन व कार्याचे अभ्यासक चंद्रकांत झटाले (अकोला) यांच्या हस्ते 15 ऑक्टोबर रोजी दिला जाणार आहे.
शरद लंगे हे आंतरभारतीचे आजीवन सभासद असून ते आंबाजोगाई येथे कार्य करतात. आंबाजोगाई शहर शाखेचे ते सक्रिय कार्यकारिणी सदस्य आहेत. मूलतः गिरवलीचे राहणारे शरद लंगे हे येथील मेडिकल परिसरातील डॉ. डावळे विद्यालयात शिक्षक आहेत. म. गांधी वरील ‘प्रश्न मंजुषा’ घेताना त्यांनी केलेली धडपड तथा स्नेहसंवर्धन पुरस्कार वितरण सोहळ्याचे यशस्वी संयोजन केल्याबद्दल त्यांना हा पुरस्कार देण्यात येत आहे असे आंतरभारतीच्या वतीने अमर हबीब (मार्गदर्शक), शैलजा बरुरे (अध्यक्ष), संतोष मोहिते (सचिव) यांनी सांगितले.
आधार मल्टीस्टेटच्या अजिंठा सभागृहात 15 ऑक्टोबर रोजी सायं 5.30 वाजता पुरस्कार वितरणाचा सोहळा होईल. या प्रसंगी चंद्रकांत झटाले (अकोला) यांचे ‘म. गांधी- वास्तव आणि विपर्यास्त’ या विषयावर व्याख्यान होईल. या सोहळ्याला आंबाजोगाईकरांनी उपस्थित रहावे असे आंतरभारतीच्या वतीने आवाहन करण्यात आले.