ताज्या घडामोडी

राजेसाहेब देशमुख यांनी साध्या पद्धतीने महाविकास आघाडीच्या वतीने केला उमेदवारी अर्ज दाखल..!

खासदार बजरंगबप्पा सोनवणे यांच्यासह महाविकास आघाडीचे नेते उपस्थित

Spread the love

परळी (प्रतिनिधी)
२३३ परळी विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार व महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार म्हणून राजेसाहेब श्रीकिशन देशमुख यांनी साध्या पद्धतीने मंगळवार, दिनांक २९ ऑक्टोबर रोजी तहसील कार्यालयात आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी बीड जिल्ह्याचे खासदार बजरंगबप्पा सोनवणे यांच्यासह महाविकास आघाडीचे प्रमुख नेते व पदाधिकारी बहुसंख्येने उपस्थित होते.

परळी शहरातील वैद्यनाथ मंदिर येथे दर्शन घेऊन, टॉवर, मोंढा मार्गे एकमिनार चौक तसेच छत्रपती शिवाजी महाराज चौक, महामानव भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे चौक, मौलाना अब्दुल कलाम चौक, हजरत दाऊद मलिकशाह बाबा दर्गाह यांना अभिवादन करून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार व महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार म्हणून राजेसाहेब श्रीकिशन देशमुख हे आपल्या सहकाऱ्यांसह उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी निघाले. बघता बघता परळी विधानसभा मतदारसंघातील अनेक गावांतील सर्वधर्मिय समाजबांधव स्वतःहून मोठ्या संख्येने सहभागी झाले. पुढे तहसील कार्यालयात जाऊन देशमुख यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी बीड जिल्ह्याचे खासदार बजरंगबप्पा सोनवणे, बीड जिल्हा काँग्रेसचे प्र.जिल्हाध्यक्ष राहुल सोनवणे, ऍड.माधव जाधव, काँग्रेसचे शहराध्यक्ष बहाद्दुरभाई, ज्येष्ठ नेते फुलचंदराव कराड, संजिवनीताई देशमुख, विशाल अंधारे, अमोल चव्हाण, अनिल जाधव, जीवनराव देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती.

▪️केलेल्या कामांची पोचपावती आशिर्वाद रूपाने जनतेकडून मिळणार – राजेसाहेब देशमुख

मागील २५ वर्षांपासून आपण परळी विधानसभा मतदारसंघातील जनतेची सेवा करीत आहोत. कधी उद्योजक म्हणून तर कधी सामाजिक कार्यकर्ता म्हणून मी काम करीत आहे. बीड जिल्हा परिषदेचा आरोग्य व शिक्षण सभापती म्हणून प्रामाणिकपणे कार्य केले आहे. अहोरात्र मी व आमचे सर्व सहकारी मिळून सेवाकार्य करीत आहोत. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार व महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार म्हणून मी आज रोजी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. केलेल्या कामांची पोचपावती आशिर्वाद रूपाने परळी विधानसभा मतदारसंघातील सर्वसामान्य जनतेकडून मिळणार याचा विश्वास आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका