भक्तिचा महापुर; पुर्णाहुती महापुजेनंतर योगेश्वरी देवीच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी
श्री योगेश्वरी देवीचा नवरात्र महोत्सव

अंबाजोगाई – महाराष्ट्राचे शक्तीपीठ व लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री योगेश्वरी देवीच्या नवरात्र महोत्सवाच्या निमित्ताने शुक्रवारी सकाळी १० वाजता पुर्णाहुती, होमहवन व महापुजेने घटस्थापनेची व योगेश्वरी देवीची महापुजा झाली. जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांनी सपत्नीक श्री.योगेश्वरी देवीची विधीवत महापुजा केली. या महापुजेनंतर देवीच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली.
३ ऑक्टोबर ते १२ आॅक्टोबर या कालावधीत योगेश्वरी देवीचा नवरात्र महोत्सव साजरा होत आहे. शुक्रवारी सकाळी मंदिरात पुर्णाहुती व होमहवन होऊन महापुजा झाली. बीडचे जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांनी सपत्नीक श्री. योगेश्वरी देवीची विधीवत महापुजा केली.
यावेळी उपजिल्हाधिकारी दिपक वजाळे, तहसीलदार विलास तरंगे,देवल कमेटीचे उपाध्यक्ष राजकिशोर मोदी,सचिव अशोक लोमटे,कोषाध्यक्ष शिरीष पांडे,
देवीचे मुख्यपुजारी सारंग पुजारी, विश्वस्त संजय भोसले,प्रवीण दामा,हंसराज देशमुख,डॉ.संध्या जाधव,सतीश लोमटे,अमोल लोमटे,राजपाल भोसले,राजाभाऊ लोमटे,अमित चव्हाण,रवि कदम यांच्यासह पुरोहित,मानकरी व भक्तांची उपस्थिती होती.
गेल्या आठवडाभरापासून मंदिर परिसरात विविध धार्मिक व सामाजिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. नवरात्र महोत्सवाच्या निमित्ताने महाराष्ट्रातून दूरदूर ठिकाणाहून लोक योगेश्वरी देवीच्या दर्शनासाठी येत आहेत. महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मंदिर परिसरात कडेकोट पोलिस बंदोबस्त तैनात ठेवण्यात आला आहे. तसेच भाविकांना विविध सेवा व सुविधा देवल कमिटीच्या वतीने उपलब्ध करून दिल्या आहेत.
शनिवारी योगेश्वरी देवीच्या पालखीने महोत्सवाची सांगता
श्री योगेश्वरी देवीच्या नवरात्र महोत्सवाची सांगता शनिवारी होणार आहे. विजयादशमीच्या निमित्ताने देवीची पालखी सिमोल्लंघनासाठी शहरातून निघणार आहे. दुपारी एक वाजता पालखी मंदिरातून निघणार आहे. प्रतिवर्षी ठरल्याप्रमाणे नियोजित मार्गाने पालखीचे मार्गक्रमण होणार आहे. अशी माहिती देवल कमिटीचे अध्यक्ष तहसीलदार विलास्त्रंगे , सचिव प्रा.अशोक लोमटे यांनी दिली.