नंदकिशोर मुंदडा यांच्या वाढदिवसा निमित्त ७१ आराधी महिलांना साड्यांचे वाटप
रोटरी क्लब चा उपक्रम

अंबाजोगाई -: येथील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते श्री
नंदकिशोर मुंदडा यांच्या वाढदिवसा निमित्त रोटरी क्लब ऑफ अंबाजोगाई सिटी यांच्या वतीने आराधी महिलांना ७१ साड्यांचे वाटप करण्यात आले.
ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते श्री. नंदकिशोर मुंदडा यांच्या वाढदिवसा निमित्त रोटरी क्लब ऑफ अंबाजोगाई सिटी यांच्या वतीने श्री. योगेश्वरी देवीच्या पालखीत सहभागी झालेल्या ७१ आराधी महिलांचा साडी चोळी देऊन सन्मान करण्यात आला. रविवार पेठ परिसरात हा उपक्रम राबविण्यात आला. यावेळी पुणे येथील उद्योजक रतीलाल कुंकुलोळ, रसिक कुंकुलोळ,संतोष कुंकुलोळ,गौतमचंद सोळंकी,
रोटरीचे अध्यक्ष कल्याण काळे, सचिव धनराज सोळंकी,
प्रोजेक्ट डायरेक्टर प्रा. रोहिणी पाठक, को.प्रोजेक्ट डायरेक्टर मंजुषा जोशी, स्वप्नील परदेशी ,गणेश राऊत,सारंग पुजारी, उपस्थित होते.