
अंबाजोगाई -:
येथील योगेश्वरी वधु-वर सूचक मंडळाच्या वतीने विविध क्षेत्रातील मान्यवरांना समाजभूषण पुरस्कार वितरण तसेच शुक्ल यजुर्वेदीय माध्यदिन महाराष्ट्रीय ब्राम्हण मध्यवर्ती मंडळ यांच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचे धनादेश वाटप असा संयुक्त कार्यक्रम नुकताच उत्साहात संपन्न झाला.
यावेळी व्यासपीठावर जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते नंदकिशोर मुंदडा,मुख्याध्यापिका स्वरूपा कुलकर्णी पत्रकार प्रशांत बर्दापूरकर ,मंडळाचे अध्यक्ष प्रभाकर सेलमुकर,बाबुराव बाभुळगाव कर, आदीसह इतर मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना मुंदडा म्हणाले की,
सामाजिक कार्यात जवाबदारीने सहभाग घेऊन ते कार्य यशस्वी करणाऱ्यांचा समाजभुषण पुरस्कार देऊन गौरव करावा ही बाब लक्षात घेऊन योगेश्वरी वधु – वर सुचक मंडळाच्या वतीने विविध क्षेत्रातील व्यक्तिंना शोधून पुरस्कार देऊन गौरविले ही बाब प्रेरणादायी आहे
या गुणवंतांनी आपल्या ज्ञानाचा उपयोग समाजासाठी करावा असेही ते म्हणाले
मुख्याध्यापिका स्वरूपा कुलकर्णी म्हणाल्या की,प्रत्येकांनी आपापल्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले त्याची दखल घेऊन मंडळाने समाजभूषण पुरस्कार देऊन गौरविले ही बाब अत्यंत महत्वाची आहे. प्रत्येकाने समाजात उदभवणाऱ्या समस्यांवर विचार करून त्या सोडविल्या तर कमी होतील व त्यावर उपाय निघेल
प्रारंभी मंडळाच्या वतीने मान्यवरांचे स्वागत राहूल देशपांडे,राजश्री पिंपळे,स्मिता भातलवंडे यांनी केले. प्रास्तविक श्रीपाद चिक्षे यांनी केले
संचालन प्रशांत बर्दापुरकर यांनी तर उपस्थितांचे आभार बाबुराव बाभुळगांवकर यांनी मानले.या कार्यक्रमास महिला, नागरीक उपस्थित होते
समाजभूषण पुरस्कार
योगेश्वरी वधु वर सूचक मंडळाच्या वतीने शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल प्रा.शशीकांत पसारकर सामाजिक क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरीबद्दल प्रतिक्षा जोशी,वधु-वर मंडळातील योगदाना बद्दल अशोक टाकळकर यांना तर वैद्यकीय क्षेत्रातील भरीव कार्याबद्दल डॉ.गौरी कुलकर्णी यांना समाजभूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.