ताज्या घडामोडी

अंबाजोगाईत पोलिसांचा जुगारी अड्डयावर छापा

५० लाख ३१ हजारांचा मुद्देमाल जप्त; २३ जणांना अटक

Spread the love

अंबाजोगाई -: अंबाजोगाई सहकारी साखर कारखाना ते लोखंडी सावरगाव रोडवर राज कला क्रिडा सांस्कृतिक मंडळाच्या नावाखाली तिर्रट नावाचा बेकायदेशिर जुगार पैसे लावून खेळताना जिल्हा पोलिस प्रमुख पथकाच्या पथकाने कारवाई केली. या कारवाईत ५० लाख ३१ हजार १७६ रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या ठिकाणाहून पोलिसांनी २३ जणांना ताब्यात घेवून अटक केली. ही कारवाई शुक्रवारी रात्री ११ नंतर झाली.
अंबाजोगाई सहकारी साखर कारखाना ते लोखंडी सावरगाव या रोडवर गेल्या अनेक दिवसांपासुन राज कला क्रिडा सांस्कृतिक मंडळाच्या नावाखाली जुगार खेेळला जातो. याची गुप्त माहिती जिल्हा पोलिस प्रमुख यांच्या पथकाला कळाली. या माहितीवरून शुक्रवारी रात्री पोलिसांनी छापा टाकला. यावेळी त्यांना तिथे २३ जण पैशावर तिर्रट नावाचा जुगार खेळताना सापडले. पोलिसांनी या ठिकाणाहून रोख रक्कम
जुगाराचे साहित्य व इतर ऐवज असा एकुण ५० लाख ३१ हजार १७६ रूपयांचा मुद्देमाल जप्त केला. या ठिकाणाहून पोलिसांनी गोविंद शत्रगुण नागरगोजे वय ३३, रा.दौनगाव ता.रेणापुर, अभिषेक संतोष कदम, वय २६, रा. कुत्तर विहिर अंबाजोगाई,
इंद्रजीत विष्णु शिंदे, वय ३६, रा.कुंबेफळ ता. अंबाजोगाई जि.बीड, अजय अनंतराव जाधव, वय ३४ वर्षे, रा.घाटनांदुर ता. अंबाजोगाई जि.बीड, उमेश छत्रभुज केकाण वय २५ वर्षे, रा.केकाणवाडी ता. केज, तुषार श्रीरंग उपाडे वय २२ वर्षे, रा.पळशी ता.रेणापुर, सुरज उत्तम उपाडे वय २६ रा.पळशी ता.रेणापुर, दत्ता बलभीम भंडारे वय ३५ वर्षे, रा.गित्ता ता. अंबाजोगाई, शिलवंत बळीराम शिंदे वय ३० वर्षे, रा.लाडेगाव ता. केज, सिद्राम राजाराम जाधव वय ४९ रा.घाटनांदुर ता. अंबाजोगाई, गोविंद छोटुसिंग छानवाळ वय ३५ रा.घाटनांदुर, रामचंद्र बाबुराव गडदे वय ४५ रा.राक्षसवाडी ता. अंबाजेागाई, रामहरी दत्तात्रय गित्ते, वय ३५ वर्षे रा.तळणी ता.अंबाजोगाई, शेख वहिद शेख हमीद वय ३८ वर्षे, रा.घाटनांदुर, ज्ञानेश्‍वर हरिभाऊ बिरंगणे वय २२ वर्षे, रा. घाटनांदुर, सागर सचिन सातपुते वय २२ वर्षे रा.अंबाजोगाई, भालचंद्र मारूती कराड वय ५३ वर्षे, रा.हनुमंतवाडी ता. अंबाजोगाई, अरविंद अंकुश गलांडे, वय ३९ वर्षे, रा.चिंचवडगाव ता.वडवणी, राहुल मारूती सुर्यवंशी वय ३४!वर्षे, रा.लातूर, भैरवनाथ सिद्राम घोगरे, वय ३२ वर्षे, रा. अंबाजोगाई, विलास धर्मराज कडकर, वय ३९ रा.कुप्ता ता. वडवणी, संजय गोकुळदास राठी, वय ३५ वर्षे रा.अंबाजोगाई, व्यंकटेश बालाजी हनवते वय २८ रा.पानगाव ता.रेणापुर या २३ जणांना पोलिसांनी ताब्यात घेवून अटक केली व त्यांच्या विरूद्ध अंबाजोगाई ग्रामिण पोलिस ठाण्यात जुगार कायद्यान्वये गुन्हा नोंद झाला आहे. या कारवाईत पोलिस अधिक्षक यांच्या पथकातील बाळराजे दराडे, पोलिस अंमलदार पटाईत, बहिर, लोंढे, पांचाळ यांच्यासह ग्रामिण पोलिस ठाण्याचे कर्मचारी सहभागी झाले होते. गेल्या अनेक दिवसांपासुन चालणार्‍या या क्लबवर अचानक धाड पडल्याने चर्चेचा विषय झाला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका