ताज्या घडामोडी
राज्य अल्पसंख्याक आयोगाच्या सदस्यपदी संजय सुराणा

अंबाजोगाई -: येथील प्रसिद्ध उद्योजक श्री
संजय लालचंदजी सुराणा यांची नुकतीच महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोगाच्या सदस्य पदी नियुक्ती करण्यात आली आहे.
महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोगावर महाराष्ट्र शासन सदस्य यांनी पदावर त्यांनी आयोगाचा कार्यभार स्विकारल्यापासून पुढील ५ वर्षांकरिता नियुक्ती करण्यात येते. बीड जिल्ह्यात प्रथमच संजय सुराणा यांना संधी मिळाली आहे. सुराणा हे सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहेत. ते क्रिडाई संघटनेचे अध्यक्ष आहेत. या संघटनेच्या माध्यमातून त्यांनी बांधकाम व्यवसायीकांचे प्रश्न सोडविले आहेत.रोटरी क्लब व विविध संस्थांचे ते प्रतिनिधी आहेत. त्यांची राज्य अल्पसंख्याक आयोगाच्या सदस्यपदी नियुक्ती झाल्या बद्दल त्यांचे सर्वत्र स्वागत होत आहे.