अंबाजोगाई तालुक्यातील धारोबाच्या घाटात बस पुलावर चढली.
ब्रेक निकामी झाल्याने झाला अपघात; प्रवासी सुखरूप

अंबाजोगाई -:
अंबाजोगाई – वाघाळा ही बस रविवारी सकाळी ७ च्या दरम्यान बसचे ब्रेक निकामी झाल्याने घाटातील कटड्यावर चढली. बस चालकाने प्रसंगावधान बाळगल्याने मोठी दुर्घटना टळली. बस मध्ये ९ प्रवासी होते.ते सर्व सुखरूप आहेत.बसचे ब्रेक निकामी झाले आहे.असा रिपोर्ट बस चालकाने देऊनही बस आगारातून गेलीच कशी? असा प्रश्न निर्माण होत आहे.
अंबाजोगाईहून तालुक्यातील मांडवा गावाकडे दहा प्रवाशी घेऊन निघालेली बस क्रमांक.एम एच १४ बी.टी.१७१९ ही बस घाटात ब्रेक निकामी झाल्याने पुलाच्या कठड्यावरून दरीत कोसळता कोसळता सुदैवाने कठड्याला अडकून बालंबाल बचावली. परिणामी मोठा अनर्थ टळला.बसमधील सर्व प्रवाशी सुखरूप असून कुठलीही हानी झाली नाही.ही घटना रविवारी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास मांडवा गावानजीक धारोबाच्या घाटात घडली बसचे.ब्रेक काम करत नाही याचा रिपोर्ट चालक पाराजी उबाळे यांनी आगार प्रशासनाकडे एक दिवस अगोदरच दिला होता. मात्र ब्रेक दुरूस्तीकडे दुर्लक्ष करण्यात आल्यानेच ही दुर्घटना घडल्याचा आरोप प्रवासी करत आहेत.
अंबाजोगाई ते मांडवा हा दहा किलोमीटर अंतराचा रस्ता हा संपूर्ण घाट रस्ता आहे.मोठमोठाले वळण रस्ते, व खोल द-या या घाटात आहेत.याठिकाणी अत्यंत काळजीपूर्वक वाहने चालवावी लागतात.रविवारी सकाळी
अंबाजोगाई – वाघाळा ही बस मांडवा मार्गे दररोज ये जा करते.रविवारी सकाळी मांडवा गावच्या नजीक वळण रस्त्यावर ब्रेक काम करत नाही हे चालकाच्या लक्षात आले. व त्यांनी बस मोठ्या शिताफीने कंट्रोल करतांना रस्त्याच्या कडेला असलेल्या पुलाच्या कठड्याला धडकून पंचाहत्तर टक्के बस दरीत झुकली. व प्रवासी बचावले.
बस मध्ये नऊ प्रवासी प्रवास करत होते.सदरील ब्रेक फेल असल्याचा रिपोर्ट चालकाने दिला होता. या बसचे ब्रेक चेक करून दुरूस्त करण्यात आले होते.तपासणी केल्यानंतर अपघाताचे नेमके कारण समोर येईल. या संदर्भात यांत्रिकी विभागात चौकशी सुरु आहे.
-: अमर राऊत , आगार प्रमुख, अंबाजोगाई.
बसचे ब्रेक काम करत नाही याचा रिपोर्ट मी आगार प्रमुखांकडे दिला होता. त्यानंतर ब्रेकचे काम केल्याचे मला सांगण्यात आले. मात्र घाटामध्ये ब्रेक काम करत नव्हते.या मुळेच ही दुर्घटना उद्भवली.
-: पाराजी ऊबाळे, बस चालक, अंबाजोगाई