योगेश्वरी ब्राम्हण वधू, वर सूचक नोंदणी पुस्तिकेचे प्रकाशन

—-
अंबाजोगाई, दि. २४ येथील योगेश्वरी ब्राम्हण वधु-वर सूचक मंडळातर्फे रविवारी वधु-वर नोंदणी पुस्तिकेचे प्रकाशन योगेश्वरी देवीच्या मंदिरात करण्यात आले.
योगेश्वरी देवल समितीचे कोशाध्यक्ष शिरीष पांडे यांच्या हस्ते या पुस्तिकेचे प्रकाशन झाले. यावेळी वधु-वर मंडळाचे अध्यक्ष पदाधिकारी प्रभाकर सेलमुकर, अशोकराव टाकळकर, सुनीलराव देशपांडे (धारूरकर), अविनाश मुडेगावकर, प्रशांत बर्दापूरकर व प्रशांत पाटील यांची उपस्थिती होती.
या मंडळाच्या वतीने वर्षातून दोन वेळा अशी वधु-वरांची नोंदणी पुस्तिका प्रकाशित केली जाते. या पुस्तिकेतील नोंदणीनुसार ज्यांचे विवाह जमलेले आहेत, त्यांच्या पालकांनी विवाह झाल्याची किंवा जुळल्याची माहिती मंडळाला कळवावी, जेणेकरून नोंदणी पुस्तिकेतील नाव वगळता येईल असे आवाहन प्रभाकर सेलमुकर यांनी केले आहे.
यावेळी योगेश्वरी देवल समितीच्या वतीने मंडळाचे पदाधिकारी यांचे स्वागत झाले.