ताज्या घडामोडी

मतदारसंघाला विकासाच्या नव्या उंचीवर नेण्यासाठी आशीर्वाद द्या – राजेसाहेब देशमुख

Spread the love

परळी -:
परळी विधानसभा मतदारसंघात राजेसाहेब देशमुख यांच्या गुरूवारी काढलेल्या जनसंवाद दौऱ्यास जनतेचा अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. परळी विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शरदचंद्र पवार पक्ष व महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार राजेसाहेब देशमुख यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर जनसंवाद यात्रेस प्रारंभ केला. गावोगावी जनसंवाद दौरा सुरू केला आहे.

गुरूवार, दिनांक ७ नोव्हेंबर रोजी गीत्ता, भारज, सुगाव, नांदगाव तांडा, नांदगाव, पोखरी या गावागावांतून सर्वधर्मीय समाज बांधव व नागरिकांनी त्यांचे सहर्ष स्वागत केले, अनेक ठिकाणी महिलांनी त्यांचे औक्षण केले. यावेळी त्यांच्यासोबत ऍड.माधव जाधव, बीड जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष राहुल सोनवणे, राहूल मोरे, ईश्वर शिंदे हे होते. मोठ्या प्रमाणात ग्रामीण मतदार या यात्रेत सहभागी होत आहेत. या जनसंवाद यात्रेच्या माध्यमातून राजेसाहेब देशमुख मतदारसंघातील नागरिकांच्या मनाचा ठाव घेत आहेत. जनतेचे प्रेम आणि समर्थन पाहून राजेसाहेब देशमुखांच्या लोकप्रियतेचा अंदाज येत आहे. परळी विधानसभा मतदारसंघात राजेसाहेब देशमुख यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर ते हा जनसंपर्क दौरा करीत आहेत. मतदारसंघात एक नवा सक्षम पर्याय व लोकप्रिय चेहऱ्याच्या रूपात ते आले आहेत. त्यांच्या या उमेदवारीला मतदारसंघातील जनतेने दिलखुलास प्रतिसाद दिला आहे. परळीतील नागरिकांना विकासाची नवी आशा वाटत आहे. या दौऱ्यात, प्रत्येक गावात त्यांचे जंगी स्वागत केलं जात आहे, आणि फुलांचा वर्षाव होत आहे. गावागावात राजेसाहेब देशमुख पोहोचताच लहान थोर, महिला आणि पुरूष मोठ्या संख्येने जनसंवाद यात्रेला उपस्थित राहताना दिसून येत आहेत. त्यांचा साधेपणा, स्पष्टवक्तेपणा आणि त्यांच्याकडे असलेले परळी विधानसभा मतदारसंघाच्या विकासाचे व्हिजन, लोकहिताच्या योजना यामुळे जनता त्यांच्याकडे मोठ्या अपेक्षेने पाहत आहेत. प्रत्येक भेटीत ते गावकऱ्यांशी थेट संवाद साधत आहेत, त्यांच्या समस्या, अडचणी समजून घेत आहेत आणि त्यांच्या प्रश्नांना सकारात्मक उत्तरे देत आहेत. प्रत्येक गावात ते लोकांशी भावनिक नातं निर्माण करीत आहेत, ज्यातून परळीचा विकास साधण्याचं त्यांचा दृढ संकल्प पाहायला मिळत आहे.
——-
परळी मतदारसंघाला नव्या उंचीवर नेण्यासाठी आपले मत देवून सहकार्य करावे :

परळीमध्ये औष्णिक विद्युत ऊर्जा निर्मिती केंद्र असून ही, सरफराजपूर गांव गेल्या महिन्याभरापासून अंधारात आहे, हे दुर्दैवी आहे. योग्य नियोजन आणि जनतेच्या सोयीसाठी वचनबद्ध राहून अशा समस्या सोडवण्यासाठी मी महाविकास आघाडीचा उमेदवार आणि आपला लोकप्रतिनिधी म्हणून कायम कटिबद्ध राहील. काल रात्री परळी मतदारसंघातील सरफराजपूर येथील मतदार बंधूंशी संवाद साधला. यावेळी आमच्यासोबत कॉ.अजय बुरांडे यांच्यासह महाविकास आघाडीचे नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी सरफराजपूर येथील जनतेच्या समस्या, प्रश्न व अडचणी जाणून घेत त्यांच्यासाठी विकासाची नवी दिशा आखण्याचा निर्धार आम्ही सर्वांनी व्यक्त केला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विचारांवर आधारित प्रगती साधून परळी मतदारसंघाला नव्या उंचीवर नेण्यासाठी आपले मत आणि सहकार्य असावे, हीच जनतेकडून अपेक्षा आहे. – राजेसाहेब देशमुख

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका