नमिता मुंदडांकडे आहे विकासाची दूरदृष्टी; केज मतदारसंघातील जनतेला ठाम विश्वास!
_केज तालुक्यात नमिता मुंदडांच्या दौऱ्याला मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

केज (प्रतिनिधी)
विकासाची दूरदृष्टी डोळ्यांसमोर ठेवून मतदार संघाचा कायापालट करीत जनसामान्यांशी नाळ असलेल्या भाजपा महायूतीच्या अधिकृत उमेदवार नमिता अक्षय मुंदडा यांना भरघोस मतांनी विजयी करण्याचा निर्धार जनतेने केला आहे. कारण, केज मतदारसंघातील जनतेला विश्वास आहे की, नमिता मुंदडा यांच्याकडे विकासाची दूरदृष्टी आहे. शनिवारी केज तालुक्यातील कानडी माळी, काशीद वाडी, नामेवाडी, गप्पेवाडी, बुरूंडवाडी, घाटेवाडी आणि आंधळेवाडी या गावात नमिता मुंदडांच्या दौऱ्याला मतदारांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
केज विधानसभा मतदार संघाच्या भाजपा महायूतीच्या अधिकृत उमेदवार नमिता अक्षय मुंदडा यांच्या प्रचारार्थ भाजपा, महायुतीचे नेते पदाधिकारी व कार्यकर्ते हे जागोजागी भेटी देत काॅर्नर बैठका घेऊन भाजपा महायुतीच्या अधिकृत उमेदवार नमिता अक्षय मुंदडा यांना विजयी करण्याचे आवाहन करीत आहेत. भेटी दरम्यान गावातील मतदार बंधू-भगिनींशी विविध विषयांवर संवाद साधत आपल्या भाषणातून ग्रामस्थांना आमदार नमिता मुंदडा यांना आशीर्वाद देण्याचे व २० नोव्हेंबर २०२४ रोजी “कमळ” या चिन्हासमोरील बटन दाबून भरघोस मतांनी विजयी करण्याचे आवाहन करीत आहेत. भाजपा, महायुतीचे नेते पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या विश्वासाने आणि सहकार्याने साबला, धर्माळा, लहुरी, कदमवाडी, सावंतवाडी व उमरी या गावातील प्रत्येक व्यक्तीला एक नवा उत्साह मिळाला असून या दौऱ्याला मतदारांचा मोठा प्रतिसाद मिळाला आहे. यावेळी नमिताताईंसोबत विविध गावांमध्ये माजी सभापती पापा शिंदे, विडा गटाचे जिल्हा परिषद सदस्य विजयकांत मुंडे, जेष्ठ नेते रमाकांत मुंडे, भाजपा वैद्यकीय आघाडीचे जिल्हाध्यक्ष डॉ.वसुदेव नेहरकर, तालुकाध्यक्ष भगवान केदार, हसंदीप पाटील, विष्णू घुले, राहूल गदळे, उषाताई मुंडे, शिवाजी पाटील, डॉ.धनराज पवार यांच्यासह आजी-माजी सरपंच, ग्रा.पं.सदस्य, सोसायटी चेअरमन, भारतीय जनता पक्ष आणि महायुतीचे सन्माननीय पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी होते. दरम्यान शनिवारी केज तालुक्यात झालेल्या भाजपा नेत्या आमदार पंकजाताई मुंडे व माजी खासदार डॉ.प्रितमताई मुंडे यांच्या विराट सभेनंतर केज तालुक्यातील मतदारांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून नमिता मुंदडा यांची बाजू अधिक भक्कम झाली असून विजयावर शिक्कामोर्तब झाला आहे.