मुलींनो मोबाईलचे दुष्परिणाम ओळखा – प्रा.संतोष मोहिते

अंबाजोगाई -: मोबाईल व इंटरनेट याचे जीवनात होणारे दुष्परिणाम ओळखा ? असे आवाहन कॉम्प्युटर वर्ल्डचे संचालक प्रा.संतोष मोहिते यांनी केले.
येथील इनरव्हिल क्लब ऑफ अंबाजोगाई व कंप्युटर वर्ल्ड यांच्या संयुक्त विद्यमाने
श्रीमती गोदावरी कुंकुलोळ योगेश्वरी कन्या शाळेत सायबर सुरक्षित मुली या विषयावर प्रा.संतोष मोहिते यांचे मार्गदर्शन झाले. आजची ज्वलंत समस्या असलेल्या शालेय मुला मुलींचा वाढता इंटरनेट चा वापर, व त्यातून मुलीं वर होणाऱ्या दुष्परिणाम याची माहिती व्हावी. या उद्देशाने इयत्ता आठवी व नववीच्या विद्यार्थीनींसाठी मोबाईल चा वापर किती , कुठे ,कसा सुरक्षित वापरावा. तसेच मोबाईल फोनचे दुष्परिणाम किती वाईट असतील या विषयाचे गांभीर्य ओळखून त्यांना सुरक्षित वापराचे तंत्र व नियम बाबत महत्त्वपुर्ण माहिती देण्यात आली. तसेच कलचाचणी देणे किती महत्त्वाचे आहे. याचीही सर्वंकष माहिती मोहिते यांनी दिली.
कार्यक्रमाला शाळेच्या मुख्याध्यापिक मिना कुलकर्णी , अंजली निर्मळे , मळेकर , स्मिता धावडकर,
इनरव्हिल क्लबच्या अध्यक्षा सुरेखा सिरसट , चंद्रकला देशमुख , सुनिता कात्रेला , वर्षा देशमुख यांची उपस्थिती होती.