आधार मल्टीस्टेटच्या मुख्य कार्यालयाला भदंत धम्मदीप महाथेरो यांची सदिच्छा भेट

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मेमोरियल सोसायटी, डॉ. आंबेडकर नगर, महू मध्य प्रदेशचे अध्यक्ष (राज्यमंत्री दर्जा) माननीय धम्मदीप महाथेरो व आर्या नंदादीप महाथेरो (एम. ए. पाली, बुद्धिझम अँड इकॉनॉमिक्स) यांनी सदिच्छा भेट दिली. सर्व कार्यालयाचे पाहणी करून सर्व संचालक व कर्मचारी यांचे कौतुक केले व पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी संस्थेचे अध्यक्ष एडवोकेट सुनील सौंदरमल, संचालक डॉ कमलाकर कांबळे, प्रा. डी.जी धाकडे, अंबाजोगाई मेडिकल असोसिएशनचे संस्थापक डॉ. राहुल धाकडे, सेवानिवृत्त पोलीस गौतम वैद्य आणि प्रभाकरजी दहिरे, संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विजय राऊत आणि सर्व कर्मचारी उपस्थित होते.
याप्रसंगी सर्वप्रथम मान्यवरांचे पुष्प देऊन स्वागत करण्यात आले आणि या कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे अध्यक्ष एडवोकेट सुनील सौंदरमल यांनी केले. तसेच आर्या नंदादीप यांनी आपले मनोगत व्यक्त केले त्यांनी बोलताना सांगितले की, मी इकॉनॉमिक्सची स्टुडन्ट आहे आणि अशा प्रकारची बँक मी पहिल्यांदाच पाहिली. अतिशय उत्कृष्ट अशा संस्थेला समाजातील सर्वांनी मदत केली पाहिजे व संस्था वाढवली पाहिजे असे सूचित केले तसेच भदंत धम्मदीप महाथेरो यांनी बोलताना म्हणाले की, माझे गुरु प्रा. सुमेध बोधी यांनी या संस्थेला भेट दिलेली आहे. त्यांचा या संस्थेला आशीर्वाद होताच आणि आमचाही कायम आशीर्वाद आपल्या पाठीशी राहील. आपण अतिशय उत्कृष्ट पद्धतीने कार्य करत आहात आणि आपले संचालक हे कुशल असल्यामुळे संस्थेची वाटचाल ही योग्य दिशेने होत आहे. असेच कार्य करत रहा टिकून ठेवा तसेच समाजातील बुद्धीजीवी घटकांनी ही संस्था वाढवण्यासाठी प्रत्येकाने मदत केली पाहिजे असे आवाहन त्यांनी केले सर्व इमारतीची पाहणी केली असता रिझर्व बँकेच्या इमारतीप्रमाणे सर्व बँकेचे रचना असल्यामुळे आणि एडवोकेट सुनील सौंदरमल व त्यांचे संचालक हे कुशल असल्यामुळे संस्थेला कुठलाही धोका होणार नाही त्यामुळे समाजातील सर्वांनी आपले व्यवहार आधार बँकेमध्येच करावे असे सुचित केले. याप्रसंगी प्राध्यापक डीजे धाकडे सर यांनीही आपले मनोगत व्यक्त केले या कार्यक्रमाचे आभार विजय राऊत यांनी मानले.