एक शेळी,व एका बैलाचा फडशा पाडून बिबट्याचा अंबाजोगाई परिसरातच वावर
ग्रामस्थांना बिबट्याचे दर्शन झाल्याने वन विभागाचे पथक ममदापूर - पाटोदा शिवारात

शेतकरी मात्र भयभीत; रात्रीची जागल बंद; शेतीची कामे झाली बंद
अंबाजोगाई -: गेल्या दोन दिवसांपासून अंबाजोगाई तालुक्यातील पूस,जवळगाव,ममदापूर,पाटोदा,व माकेगाव या शिवारात ग्रामस्थांना बिबट्याचे दर्शन झाल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे. शुक्रवारी वण विभागाच्या पथकाने या परिसरात पाहणी केली. कांहीं ठिकाणीं ठसे ही अढळले आहेत. तर बिबट्याने दोन दिवसात एक शेळी व एका बैलाचा फडशा पाडला आहे.
अंबाजोगाई शहरतील बुट्टेनाथ परिसरापासून वण विभागाचे मोठे जंगल विस्तीर्ण आहे. या परिसरात अनेक वन्य व इतर प्राण्यांच्या मोठा वावर आहे. या परिसरात तडस,बिबट्या ही अनेकदा अढळून आल्याचे निदर्शनास आले आहे. मात्र गेल्या दोन दिवसात बिबट्याचा वावर तालुक्यातील ममदापूर, पाटोदा,पूस,जवळगाव परिसरात ग्रामस्थांच्या निदर्शनास आला.गुरुवारी रात्री तर ममदापूर – पाटोदा शिवारात लेंडी परिसरात या बिबट्याचा काढलेला व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. भीतीपोटी रात्री शेतात जाणेही ग्रामस्थांनी बंद केले आहे. यातच गुरुवारी रात्री माकेगाव परिसरात रवि देशमुख यांच्या शेतातील बैलाचा बिबट्याने फडशा पाडला.तसेच या परिसरात वण विभागाच्या पथकाला ठसे ही आढळले. त्यामुळे या बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे.
वण विभागाच्या वतीने बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी प्रक्रिया सुरू आहे. मात्र ग्रामस्थांनी आपल्या लहान मुलांना एकटे शेतात जाऊ देऊ नये.शेतकऱ्यांनी रात्री शेतात एकटे थांबू नये. मोठ्या आवाजात गाणी लावावीत. आवशकते नुसार संरक्षण करावे.
-: विजया शिंगोटे, वणपाल क्षेत्र निरीक्षक,अंबाजोगाई.