तलवारबाजी क्रीडा स्पर्धेत कै. दादाराव कराड विद्यालयाचे यश

अंबाजोगाई -: जिल्हास्तरीय शालेय तलवारबाजी क्रीडा स्पर्धेत कै. दादाराव कराड विद्यालयाने यश मिळविले आहे.
जिल्हास्तरीय शालेय तलवारबाजी स्पर्धेचे आयोजन छञपती संभाजी राजे ग्लोबल इंग्लिश स्कूल अंबाजोगाई येथे करण्यात आले होते. या क्रीडा स्पर्धेत माईर एम आय टी पुणे संचलित कै. दादाराव कराड माध्यमिक विद्यालय अंबाजोगाई येथील पियूष दत्ता रंजवे या विद्यार्थ्याने तलवारबाजी या क्रीडा स्पर्धेत पहिला क्रमांक पटकावला. आणि जिल्हास्तरीय तलवारबाजीतील फॉइल या क्रीडा स्पर्धेत आपले नाव नोंदवले. त्याबद्दल विद्यार्थी पियुष रंजवे यांचे संस्थेचे संस्थापक मा. डॉ. वि.दा. कराड, अंबाजोगाई स्कूल डिव्हीजन चे कार्यकारी संचालक राजेशजी कराड व शुभांगी कराड, संचालक संगप्पा तलेवाड, प्राचार्य रामराजे कराड क्रीडा शिक्षक घुले पी एस व शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी स्वागत केले.