अंबाजोगाईत सकल हिंदू समाजाचे धरणे आंदोलन
बांगलादेशातील हिंदूंवर झालेल्या आत्यचाराचा केला निषेध

अंबाजोगाई -: बांगलादेशात अल्पसंख्याक असलेल्या हिंदू बांधवांच्या होत असलेल्या हत्येचा निषेध व्यक्त करत, त्यांना संरक्षण द्या. विविध मागण्यांसाठी मंगळवारी अंबाजोगाईत सकल हिंदू समाजाच्या वतीने येथील छत्रपती शिवाजीमहाराज चौकात धरणे आंदोलन करण्यात आले. तसेच मोर्चा द्वारे उपजिल्हाधिकारी यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
गेल्या कांहीं महिन्यांपासून बांगलादेशात अल्पसंख्याक असलेल्या हिंदूंच्या मानवधिकार, मालमत्ता आणि अनेक जीवांचे हंनन झाल्याचे निदर्शनास आले आहे.तसेच मंदिरांची तोडफोड,महिलांवरील अत्याचारांच्या घटना घडल्या आहेत. या सर्व घटनांचा निषेध नोंदवत त्या बांधवांना संरक्षण द्या. या मागणीचे निवेदन उपजिल्हाधिकारी यांच्या मार्फत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठविण्यात आले आहे.
दरम्यान या मागणीकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी मंगळवारी सकाळी सकल हिंदू समाजाच्या वतीने छत्रपती शिवाजीमहाराज चौकात धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी भजनी मंडळाच्या वतीने या ठिकाणी भजनही करण्यात आले. याठिकाणी जमलेल्या हिंदू बांधवांनी छत्रपती शिवाजी महाराज चौक ते उपजिल्हाधिकारी कार्यालया पर्यंत मोर्चा काढला. व विविध मागण्यांचे निवेदन उपजिल्हाधिकारी यांना दिले. यावेळी सकल हिंदू बांधव,महिला, विविध संस्था व संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.