जागतिक मानवी हक्क दिन व संविधान जागर रॅली
मानवलोक समाजकार्य महाविद्यालय व मनस्विनी महिला प्रकल्प यांचा पुढाकार

अंबाजोगाई (प्रतिनिधी)
जागतिक मानव अधिकार दिनाचे औचित्य साधून जनजागृतीपर रॅलीचे आयोजन मानवलोक समाजकार्य महाविद्यालयाच्या पुढाकाराने १० डिसेंबर रोजीशहरातून करण्यात आले.
शहरातील प्रमुख ठिकाणी विविध विषयाचे पोस्टर्स प्रदर्शन भरविण्यात आले व लोकांशी संवाद साधण्यात आला.
मानवी अधिकार जनजागृतीपर रॅली ही मानवलोक समाजकार्य महाविद्यालयाच्या परिसरापासून सुरू झाली. यामध्ये महाविद्यालयातील विद्यार्थी व मनस्विनी महिला प्रकल्पातील गावपातळीवरी कार्यकर्ते सहभागी झाले होते. ही रॅली तथागत चौक, बसस्थानक मार्गे आंबेडकर चौक, स्वामी रामानंद तीर्थ महाविद्यालयात दाखल झाली. या मार्गावरील सर्व प्रमुख चौकामध्ये व बसस्टॅन्डमध्ये मानव अधिकार, बालविवाह, कौटुंबिक हिंसाचार, महिलांना होणारी छेडछाड या विषयीचे पोस्टर्स प्रदर्शन लावण्यात आले होते.
या रॅलीचा समारोप स्वामी रामानंद तीर्थ महाविद्यालयात करण्यात आला. त्यावेळी मानवलोक समाजकार्य महाविद्यालयातील प्राचार्य व प्रा.अरूंधती पाटील यांचे स्वागत करण्यात आले. तसेच या परिसरात प्रदर्शनही लावण्यात आले होते. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांशी संवाद करतांना विद्यार्थ्यांनी त्यांना मानवीय अधिकार याची ओळख करून दिली व सेल्फी पॉईंटमधून 18 वर्षा आतील मुलींशी विवाह करणार नाही याची शपथही त्यांना देण्यात आली.
कार्यक्रमाचा समारोप प्राचार्य पी. आर
थारकर, प्रा.आर. एस. सोनवळकर व प्रा. सोनवणे तसेच मानवलोक समाजकार्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रकाश जाधव,प्रा. अरूंधती पाटील यांच्या मार्गदर्शनाने झाला. रॅली व पोस्टरच्या आयोजनामध्ये मनस्विनी महिला प्रकल्पाचे कार्यकर्ते राहूल निपटे, कृष्णा गुरव, हर्षा पूरी, आश्विनी बुरकुले व
यामध्ये मानवलोक समाजकार्य महाविद्यालयाचे सर्व कर्मचारी व मनस्विनी महिला प्रकल्पाचे कार्यकर्ते उपस्थित होते.