मंगल सुतार यांना राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार

केज : पुणे येथील जिल्हा परिषदेच्या शरद पवार सभागृहात पार पडलेल्या कार्यक्रमात केज तालुक्यातील जिल्हा परिषद कानडी माळी शाळेतील शिक्षिका मंगल माधवराव सुतार यांचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवगीर्य शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी संघटनेच्या वतीने दिला जाणारा राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्काराने गौरव करण्यात आला.
यावेळी संचालक महेश पालकर, सहायक आयुक्त विशाल लोंढे, पीसफुल एज्युकेशनच्या दक्षिण कोरियाच्या सचिव व्हिक्टोरिया, प्रशासन अधिकारी काळे, महिला आघाडीच्या राज्याध्यक्ष
सुनंदा त्रिगुणायत, संघटनेचे राज्याध्यक्ष सत्यजित जानराव, सचिव संतोष गायकवाड, शिक्षक संघटना समन्वय समितीचे राज्य अध्यक्ष अरुण जाधव यांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र राज्य शिक्षक संघटना समन्वय समितीचे राज्य अध्यक्ष अरुण जाधव, समन्वय समितीचे प्रकाश घोळवे, उपाध्यक्ष रमेश कांबळे यांच्यासह इतर मान्यवरांची उपस्थिती होती.
मंगल सुतार यांना मिळालेल्या पुरस्कारा बद्दल त्यांचे सर्वत्र स्वागत होत आहे.