रोटरी कॉन्फरन्समध्ये पेट्रोल -डिझेल च्या स्टिकर्सचे लोकार्पण

अंबाजोगाई -: पेट्रोल पंपावर अनेकदा चुकीमुळे डिझेलच्या टाकीत पेट्रोल, तर पेट्रोलच्या टाकीत डिझेल टाकले जाते. परिणामी या चुकीचा मोठा त्रास वाहनधारकांना सहन करावा लागतो. हा त्रास दूर करण्यासाठी रोटरी क्लब ऑफ अंबाजोगाई सिटीने शेगांव येथे झालेल्या रोटरीच्या कॉन्फरन्समध्ये चारचाकी वाहनांना लावण्यासाठी
पेट्रोल -डिझेलच्या स्टिकर्स तयार केले. या स्टिकर्सचे लोकार्पण सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत झाला.
या वेळी रोटरीचे प्रांतपाल सुरेश साबू,सौ. निर्मला साबू,रोटरीचे आंतरराष्ट्रीय संचालक श्रीनिवास मूर्ती,माजी प्रांतपाल ओमप्रकाश मोतीपवळे, रोटरीचे अध्यक्ष कल्याण काळे, सचिव धनराज सोळंकी,उपाध्यक्ष अजित देशमुख,प्रा.संतोष मोहिते प्रा.रोहिणी पाठक,प्रवीण चोकडा,डॉ.अनिल केंद्रे,यांची उपस्थिती होती.
यावेळी बोलताना सुरेश साबू म्हणाले की अंबाजोगाई रोटरीने क्लबने या स्टिकर्सच्या माध्यमातून वाहन धारकांची गैरसोय दूर होणार आहे. असा उपक्रम सर्वच क्लब ने राबविण्याचे आवाहन त्यांनी केले.
