अंबाजोगाईत रोटरी क्लबने केली २४०० विद्यार्थ्यांची मोफत दंत तपासणी
८ शाळांमधे झाले दंत तपासणी शिबिर; २३ डॉक्टरांचा सहभाग

अंबाजोगाई -: येथील रोटरी क्लब ऑफ अंबाजोगाई सिटीच्या वतीने शनिवारी सकाळी एकाचवेळी ८ शाळेमध्ये मोफत दंत तपासणी शिबिर झाले. शहरातील २३ दंत चिकित्सक डॉक्टरांनी २४०० विद्यार्थ्यांची तपासणी व औषधोपचार केले.
या शिबिराचे उद्घाटन गुरुदेव विद्यालयात झाले. यावेळी सामाजिक कार्यकर्त्या डॉ.हर्षा काळे, रोटरीचे अध्यक्ष कल्याण काळे, सचिव धनराज सोळंकी, प्रकल्प संचालक डॉ.श्रीनिवास रेड्डी, सह संचालक डॉ.सचिन पोतदार,रोटरीचे उपाध्यक्ष अजित देशमुख,जगदीश जाजू, प्रा. संतोष मोहिते, राजेंद्र घोडके, डॉ.अनिल केंद्रे,प्रदीप झरकर,स्वप्नील परदेशी,रुपेश रामावत,राधेश्याम लोहिया,सचिन बेंबडे,गणेश राऊत,संभाजी बुर्गे,भिमसेन लोमटे,रमेश देशमुख,यांची उपस्थिती होती.शहरातील गुरुदेव विद्यालय, बालनिकेतन, खोलेश्वर विद्यालय, वेणूताई चव्हाण कन्या विद्यालय,डॉ.राम भालचंद्र विद्यालय,संकल्प विद्यालय,कर्तव्य कर्णबधीर मुलींचे विद्यालय, डॉ.महमद इकबाल विद्यालय या सर्व शाळांमधे २४०० विद्यार्थ्यांची दंत तपासणी करण्यात आली. या उपक्रमात डॉ. हर्षा काळे,डॉ. प्रवीण जोशी,डॉ. उदय सोनी,डॉ.शुभांगी चव्हाण,डॉ.ऋषिकेश घुले,डॉ.अश्विनी घुले,डॉ.शीतल सोनवणे,डॉ.मंगल बाहेती,डॉ.सुजाता डोंगरे,डॉ.पूजा कुंडगिर,डॉ.श्वेता मुंडे,डॉ.दिपाली गिराम,डॉ.अंजली रेड्डी,डॉ.पूनम घुले,डॉ.पूजा लोमटे यांनी तपासणी करून आपला सहभाग नोंदविला. या दंत शिबिराच्या यशस्वितेसाठी रोट्रॅक्ट क्लबचे जतिन कर्णावट,रमन भन्साळी,सुशील गिल्डा,सर्वेश बजाज,संदीप जाधव,सुशील गंगणे, मयूर परदेशी,सूशाल मारू,नेहा जैन यांनी परिश्रम घेतले.
दूषित पाण्यामुळे दात किडन्याचे प्रकार वाढले -:
आज झालेल्या दंत तपासणी शिबिरात विद्यार्थ्यांची तपासणी झाली. या तपासणीत प्रामुख्याने अनेक विद्यार्थ्यांच्या दातांवर लाल व पांढरे डाग अढळून आले. पिण्याच्या पाण्यातील क्लोराईडचे वाढते प्रमाण व दूषित पाणी यामुळे हा आजार उद्भवतो.
-: डॉ.अश्विनी घुले,दंत चिकित्सक,अंबाजोगाई.