नंदिनी कुलकर्णी ची इंद्रधनुष्य युवक महोत्सवासाठी निवड

अंबाजोगाई – खोलेश्वर महाविद्यालय अंबाजोगाई च्या संगीत व सांस्कृतिक विभागाची इयत्ता बी.ए. प्रथम वर्ष वर्गातील विद्यार्थिनी कु. नंदिनी विष्णुपंत कुलकर्णी हिची दि. 9 ऑक्टोबर 2024 रोजी छत्रपती संभाजीनगर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठामध्ये संपन्न झालेल्या इंद्रधनुष्य अंतर विद्यापीठीय युवक महोत्सवाच्या पूर्व चाचणी मध्ये समूह गायन भारतीय व समूह गायन पाश्चात्य कला प्रकारांमध्ये निवड झाली आहे. सदरील इंद्रधनुष्य अंतर विद्यापीठ युवक महोत्सव हा अकोला येथे दिनांक 7, 8, 9, 10 नोव्हेंबर 2024 रोजी संपन्न होणार आहे यासाठी या विद्यार्थिनीस खूप खूप शुभेच्छा सदरील विद्यार्थिनीचा सत्कार करताना भा. शि प्र. संस्थेचे सन्माननीय अध्यक्ष डॉ.सुरेंद्र आलूरकर व इतर मान्यवर या विद्यार्थिनीचे संस्थेचे कार्यवाह डॉ. हेमंत वैद्य प्रशासकीय अधिकारी प्रा. चंद्रकांत मुळे खोलेश्वर शैक्षणिक संकुलाचे अध्यक्ष विजयराव वालवडकर कार्यवाह किरण कोदरकर, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मुकुंदजी देवर्षी तसेच सर्व उपप्राचार्य पर्यवेक्षक व प्राध्यापकांनी तिचे अभिनंदन केले.