सौ.वैशाली कुलकर्णी यांना बेस्ट टीचर अवॉर्ड प्रदान

_(तेराव्या राष्ट्रीय गुरु अबॅकस लेवल स्पर्धेत अंबाजोगाई चे विद्यार्थी चमकले )_
अंबाजोगाई (प्रतिनिधी )पुणे येथे संपन्न झालेल्या तेराव्या राष्ट्रीय गुरु अबॅकस स्पर्धा २०२५ मध्ये अंबाजोगाई शहरातील गुरु अबॅकस संचालिका सौ.वैशाली कुलकर्णी (पुसकर )यांना बेस्ट टीचर अवार्ड सुप्रसिद्ध अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड व पुणे विभागीय मा.आमदार तुपे सर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला आहे. तसेच त्यांच्या अबॅकस क्लास मधील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवले असून या विद्यार्थ्यांचे व पुरस्कार प्राप्त मार्गदर्शिका सौ.वैशाली कुलकर्णी यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
या यशस्वी विद्यार्थ्यांमध्ये मास्टर ऑफ अबॅकस डिग्री प्राप्त अथर्व टेकाळे आहे. तसेच
रुद्र पाथरकर, सिद्धी सोळंके प्रतिक राऊत, पृथ्वीराज देशमुख ,प्रसाद साबळे, गणेश शेप, अयान शेख,,हमदान शेख या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवले, असून त्यांनी अंबाजोगाई शहरातील प्रसिद्ध अशा गुरु अबॅकस या ठिकाणी त्यांच्या मार्गदर्शिका सौ.वैशाली कुलकर्णी (पुसकर)यांच्याकडून अबॅकस चे प्रशिक्षण घेतलेले आहे.
विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या या यशाबद्दल या यशस्वी विद्यार्थ्यांचे व त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या गुरु अबॅकसच्या संचालिका सौ. वैशाली कुलकर्णी (पुसकर)यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.