ताज्या घडामोडी
तेराव्या राष्ट्रीय गुरु अबॅकस लेवल स्पर्धेत अंबाजोगाई चे विद्यार्थी चमकले

अंबाजोगाई (प्रतिनिधी )पुणे येथे संपन्न झालेल्या तेराव्या राष्ट्रीय गुरु अबॅकस स्पर्धा २०२५ मध्ये अंबाजोगाई शहरातील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवले असून या विद्यार्थ्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
या यशस्वी विद्यार्थ्यांमध्ये मास्टर ऑफ अबॅकस डिग्री प्राप्त अथर्व टेकाळे,रुद्र पाथरकर, सिद्धी सोळंके प्रतिक राऊत, पृथ्वीराज देशमुख ,प्रसाद साबळे, गणेश शेप, अयान शेख,,हमदान विद्यार्थी असून त्यांनी अंबाजोगाई शहरातील प्रसिद्ध अशा गुरु अबॅकस या ठिकाणी त्यांच्या मार्गदर्शिका सौ.वैशाली कुलकर्णी यांच्याकडून अबॅकस चे प्रशिक्षण घेतलेले आहे.
विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या या यशाबद्दल या यशस्वी विद्यार्थ्यांचे व त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या गुरु अबॅकसच्या संचालिका सौ. वैशाली कुलकर्णी यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.