
वैद्यकिय तज्ज्ञांचा सहभाग
अंबाजोगाई : भावी काळात वैद्यकीय क्षेत्रातील आव्हानांना सामोरे जाण्यासाठी सज्ज रहावे असे आवाहन आयएमएचे नियोजित राज्य अध्यक्ष डॉ. संतोष कुलकर्णी यांनी रविवारी येथे वैद्यकीय परिषदेत केले.
येथील डाॅक्टरांच्या आयएमएच्या आयएमएकॉन परिषदेत डॉ. संतोष कुलकर्णी बोलत होते. वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञ डॉक्टर, अध्यक्षस्थानी स्वाराती वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. शंकर धपाटे हे होते. डॉ. अभिमन्यू तरकसे, आयएमएचे अंबाजोगाई शाखाध्यक्ष डॉ. नवनाथ घुगे, सांस्कृतिक विभाग सचिव डॉ.राजेश इंगोले, दंतरोग तज्ज्ञ डॉ. नरेंद्र काळे, स्वारातीचे स्त्रीरोग विभाग प्रमुख डॉ. गणेश तोंडगे, एम्पाच्या अध्यक्षा डॉ. सुलभा पाटील, आयएमएचे सचिव डॉ .सचिन पोद्दार यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती.
डॉ.संतोष कुलकर्णी म्हणाले की, जगभरात वैद्यकीय क्षेत्राला अनन्य साधारण महत्त्व आहे. जगाचे ज्ञान व होणारे बदल देशातील डॉक्टरांना ज्ञात व्हावेत व त्यावर सर्वांनी काम करावे यासाठी अशा परिषदा महत्वाच्या असल्याचे डाॅ. कुलकर्णी म्हणाले.
यावेळी अधिष्ठाता डॉ. शंकर धपाटे, डॉ.राजेश इंगोले यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. नवनवीन अत्याधुनिक तंत्रज्ञान बाजारात येत आहेत त्याचे ज्ञान आत्मसात करण्यासाठी ही परिषद महत्त्वाची ठरणार असल्याचे डाॅ. नवनाथ घुगे यांनी सांगितले.
परिषदेच्या सकाळच्या सत्रात लातूरचे पोटविकार तज्ज्ञ डाॅ. प्रविण गंभीरे यांनी कावीळ व पोटविकार या विषयावर मार्गदर्शन केले. डॉ.नवनाथ घुगे, डॉ. गणेश तोंडगे, डॉ. अनिल भुतडा यांनी यात सहभाग घेतला. रक्तदान या विषयावर ह्रदयरोग तज्ज्ञ डॉ. दिपक कटारे यांनी मार्गदर्शन केले. यात डॉ. मधुकर कांबळे, डॉ. दिलीप नागरगोजे व डॉ.गोपाळ पाटील यांनी सहभाग. थायरॉईड विकाराच्या विषयावर छत्रपती संभाजीनगरचे अंर्तग्रंथी तज्ज्ञ डॉ. निलेश लोमटे यांनी मार्गदर्शन केले. यात परळीच्या स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. शालीनी कराड, डॉ. वैशाली भावठाणकर, डॉ. संदिप थोरात यांचा सहभाग होता. मधुमेह या विषयावर मधुमेह तज्ज्ञ डॉ. संजीव इंदुरकर यांनी मार्गदर्शन केले. डॉ. शुभदा लोहिया, डॉ. प्रल्हाद गुरव, डॉ. सुनिल जाधव यांचा सहभाग घेतला.
रक्तक्षय व रक्तविकार या विषयावर रक्तविकार तज्ज्ञ डॉ. मनोज तोष्णीवाल यांनी मार्गदर्शन केले. यात डॉ. अमृता पाटील, डॉ. योगीनी थोरात, डॉ. शारदा इरपतगिरे हे सहभाग घेतला. मिरगी व मेंदु संदर्भातील विषयावर सोलापुरचे मेेंदुविकार तज्ज्ञ डॉ.अश्विन वळसंगकर यांनी मार्गदर्शन केले. यात डॉ. संजय चव्हाण, डॉ. वर्षा कस्तुरकर, डॉ. सचिन चौधरी यांनी सहभाग घेतला. वात विकारावर तज्ज्ञ डॉ.अमोल राऊत यांनी मार्गदर्शन केले. डॉ.अनिल मस्के, डॉ. सारिका शिंदे, डॉ. रचना जाजु यांनी सहभाग घेतला. हदयविकारावर लातुरचे प्रसिद्ध हदयरोगतज्ञ डॉ. संजय शिवपुजे यांनी मार्गदर्शन केले. डॉ.अनुप पाटील, डॉ. मनिषा फड, डॉ. राहुल धाकडे, डॉ. राजेश पाटील यांनी सहभाग घेतला.
ही आयएमएकॉन परिषद यशस्वी करण्याठी डॉ. नितिन चाटे, डॉ. अरुणा केंद्रे डॉ. विनोद जोशी, डॉ. निलेश तोष्णीवाल, डॉ. सुधीर धर्मपात्रे, डॉ. अतुल शिंदे, डॉ. राजश्री धाकडे, डॉ. स्नेहल होळंबे, स्त्री रोग विभागातील सर्व डॉक्टर्सनी पुढाकार घेतला.