ताज्या घडामोडी

ब्राह्मण समाजाच्या मागण्यांचा शासनाकडे पाठपुरावा करू – आ. नमिता मुंदडा

ब्राह्मण ऐक्य परिषदेच्या वतीने आ.नमिता मुंदडा यांचा सत्कार

Spread the love


अंबाजोगाई -:ब्राह्मण समाजाच्या ज्या प्रलंबित मागण्या आहेत.त्यांची पूर्तता करण्यासाठी आपण शासनाकडे पाठपुरावा करून, या मागण्या मान्य करण्यासाठी प्रयत्नशील राहील.अशी ग्वाही केज विधानसभा मतदार संचाच्या आमदार नमिता अक्षय मुंदडा यांनी दिली.
भगवान परशुराम आर्थिक विकास महामंडळ स्थापन झाल्याबद्दल महायुती सरकार चे आभार व या कामासाठी वेळोवेळी आ.नमिता मुंदडा यांनी केलेला पाठपुरावा. याबद्दल बुधवारी सायंकाळी धाकटे देवघर येथे
ब्राम्हण ऐक्य परिषदेच्या वतीने त्यांच्या सत्काराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सत्काराला उत्तर देताना आ. मुंदडा बोलत होत्या.
यावेळी व्यासपीठावर ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या शरयू हेबाळकर, माजी नगरसेवक डॉ.अतुल देशपांडे,भाजपा चे प्रवक्ते राम कुलकर्णी,ब्राह्मण सभेचे अध्यक्ष अनिरुद्ध चौसाळकर,संगीता काटे, गिता कुलकर्णी,डॉ. सुधीर धर्मपात्रे,मकरंद कुलकर्णी,डॉ.गोपाळ चौसाळकर,मंदार काटे,पद्मनाभ देशपांडे,शैलेश गोस्वामी उपस्थित होते.
यावेळी डॉ अतुल देशपांडे यांनी आपल्या प्रास्ताविकात आ. नमिता मुंदडा यांनी आर्थिक विकास महामंडळासाठी दिलेल्या योगदानाची माहिती दिली.यावेळी शरयू हेबाळकर,राम कुलकर्णी,अनिरुद्ध चौसाळकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
यावेळी ब्राह्मण ऐक्य परिषदेच्या वतीने आ.नमिता मुंदडा यांचा शाल, श्रीफळ व सन्माचिन्ह देऊन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कार आला.
या कार्यक्रमाचे संचालन प्रज्ञा रामदासी यांनी केले.तर उपस्थितांचे आभार गीतांजली कुलकर्णी यांनी मानले. या कार्यक्रमास महिला व नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थित होती.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका