कोळी महादेव समाजाला विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी कार्यकर्त्यांनी मोठी चळवळ उभा करावी -अविनाश कोळी
अंबाजोगाई येथे पदाधिकारी अभ्यासक यांची संवाद बैठक

अंबाजोगाई प्रतिनिधी
आदिवासी कोळी महादेव समाज विकासापासून कोसो दूर आहे. तळागळातील आदिवासी कोळी महादेव समाजाला विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी आदीम विकास परिषदेच्या कार्यकर्त्यांनी मोठी चळवळ उभा करावी त्याला पाठबळ देण्याचे काम पूर्ण क्षमतेने मी करीन असे वक्तव्य आदीम विकास परिषदेचे महाराष्ट्र अध्यक्ष अविनाश कोळी यांनी अंबाजोगाई येथे मराठवाड्यातील पदाधिकारी आणि अभ्यासक यांची संवाद बैठक बुधवार ता.२६ आयोजित केली होती यावेळी ते बोलत होते.
कार्यक्रमाची सुरुवात आद्यकवी महर्षी वाल्मिकी ऋषी बिरसा मुंडा राघोजी भांगरे यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नरसिंग बरेवाड प्रमुख पाहुणे म्हणून आदीम विकास परिषदेचे अध्यक्ष अविनाश कोळी ,रमेश पिटलवाड ,साहेबराव दांडगे ,रामभाऊ काळगे ,राम चामे ,बापू जगडे ,श्री रेखडगेवाड, गणेश सूर्यवंशी, संजय चमूलवाड, अॅड बोरगे, साधुराम बोयणे, यांची प्रमुख उपस्थिती होती.
अविनाश कोळी यांची रेल्वे सल्लागार समितीच्या सदस्य पदी निवड झाल्याबद्दल आदिवासी कोळी महादेव समाजाच्या वतीने सत्कार करून शुभेच्छा देण्यात आल्या.पुढे बोलताना कोळी म्हणाले की आदिवासी कोळी महादेव समाजाला सुलभ रीतीने जमातीचे प्रमाणपत्र आणि वैद्यता प्रमाणपत्र मिळत नाही. प्रमाणपत्र मिळत नसल्यामुळे समाज विकासापासून दूर आहे. समाजातील प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचून त्याच्या समस्या समजून घेऊन संघटनेतील कार्यकर्त्यांनी तळागाळातील समाजाला विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्नशील राहावे. समाजातील प्रत्येक व्यक्तीला न्याय मिळवून देण्यासाठी काम करावे. आदीम विकास परिषदेच्या कार्यकर्त्यांनी कोळी महादेव समाजातील प्रत्येक व्यक्तीला जमातीचे प्रमाणपत्र आणि वैधता प्रमाणपत्र मिळवून देण्यासाठी काम करावे. समाजाच्या समस्या सोडवण्यासाठी मी सदैव कार्य करीत राहील. आपण सर्वांनी पुढे येऊन एक मोठी चळवळ उभा करावी आणि समाजाला विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी काम करावे असे आव्हान अविनाश कोळी यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आदिम विकास परिषदेचे जिल्हाध्यक्ष संतोष कोळी, अशोक सोनवणे हेमंत दशवंते ,अरुण दहिभाते ,धनंजय निरडे ,आर. डी वाघमारे ,अशोक कोळी ,प्रा. देविदास खोडेवाड ,लक्ष्मण इंगोले ,बाबांना इंगळवाड ,अशोक दशवंते आदींनी परिश्रम घेतले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन प्राध्यापक देविदास खोडेवाड यांनी मानले.