आ.नमिताताई यांनी केलेल्या विकासकामांमुळे भाजपात इन्कमिंग वाढले..!
केजमध्ये विजयासाठी युवा वर्ग सरसावला ; अनेकांचा भाजपात प्रवेश

केज (प्रतिनिधी)
केज विधानसभा मतदारसंघात महायुतीच्या उमेदवार आ.नमिता अक्षय मुंदडा यांच्या विजयासाठी केज शहरातील अनेकांनी भाजपामध्ये जाहीर प्रवेश केला. ज्येष्ठ नेते नंदकिशोर मुंदडा यांनी त्यांचे भाजपामध्ये सहर्ष स्वागत केले.
आ.नमिताताई यांनी केलेल्या विकासकामांमुळे भाजपात इन्कमिंग वाढले आहे. केजमध्ये विजयासाठी युवा वर्ग सरसावला आहे. त्यामुळे मागील काही दिवसांपासून अनेकांनी भाजपात प्रवेश केला आहे. केज शहर आणि परिसरातील वातावरण आ.नमिता मुंदडा यांना पुर्वीही अनुकूल होते. आता तर अधिकच पोषक झाले आहे. कारण, केज शहरातील सचिन रोडे, अतुल गुंड व लखन शिंदे यांच्यासह त्यांच्या असंख्य सहकाऱ्यांनी आमदार पंकजाताई गोपीनाथराव मुंडे , माजी खा.डॉ.प्रितमताई मुंडे, नंदकिशोर मुंदडा (काकाजी), आ.नमिता अक्षय मुंदडा आणि अक्षय भैय्या मुंदडा यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन भारतीय जनता पक्षामध्ये जाहीर प्रवेश केला आहे. याप्रसंगी नंदकिशोर मुंदडा, व्यापारी महासंघाचे अध्यक्ष महादेव सूर्यवंशी, संजय गुंड, गोविंद बापू शिंपले यांचेसह अनेकांची प्रमुख उपस्थिती होती. झालेल्या या पक्ष प्रवेशामुळे केज शहरातील राजकीय वातावरण आ.नमिता मुंदडा यांना अधिक पोषक झाल्याचे पहावयास मिळत आहे. या पक्ष प्रवेशाची चर्चा सर्वत्र सुरू झाली आहे. केज विधानसभा मतदारसंघात महायुतीच्या उमेदवार आ.नमिता अक्षय मुंदडा यांच्या विजयासाठी केज शहरातील अनेकांनी भाजपामध्ये जाहीर प्रवेश केला आहे. भाजपामध्ये प्रवेश करणाऱ्यांचे ज्येष्ठ नेते नंदकिशोर मुंदडा यांनी सहर्ष स्वागत केले.