ब्राम्हण समाजाच्या उत्कर्षासाठीच परशुराम अर्थिक विकास महामंडळाची निर्मिती -अशिष दामले

अंबाजोगाई (प्रतिनिधी)
वेदपाठशाळेतील विद्यार्थ्यांना परशुराम आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून विद्यावेतन व उच्च शिक्षण घेण्यासाठी
डिप्लोमा इन पौरोहित्य या शासनमान्य कवि कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ,रामटेक नागपूर व विश्व विद्या प्रतिष्ठान पारनेर येथील अभ्यासक्रमासाठी प्रयत्नशिल राहणार असल्याचे मत परशुराम अर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष कॅप्टन अशिष दामले यांनी व्यक्त केले.
ते अंबाजोगाईत अ.भा.पेशवा संघटनच्या वतीने आयोजित कार्यक्रमात बोलत होते. व्यासपीठावर अ.भा.पेशवा संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुधीर धर्माधिकारी,दुर्गादास दामोशन,महेंद्र रायकर, संजय देशपांडे,अभय जोशी,महिला पदाधिकारी आर्ती सोनेसांगवीकर, दिपाली पत्की,सुनंदा मोरगांवकर,सविता देशमुख,काठी आदी उपस्थित होते. पुढे दामले म्हणाले की, ब्राम्हण समाजाच्या उत्कर्षासाठीच परशुराम अर्थिक विकास महामंडळाची निर्मिती राज्य शासनाने केली असून त्याचा फायदा सर्वांनाच कसा होईल यासाठी मी कटीबद्ध आहे. धर्माधिकारी यांनी वेद पाठशाळेतील विद्यार्थ्यांसाठी अर्थिक मदत आवश्यक असून त्यातूनच संस्कृतीचे रक्षण होईल असे सांगितले.
संघटनेच्या वतीने अशिष दामले यांचा गौरव करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्तविक मकरंद सोनेसांगवीकर यांनी केले.अभय जोशी यांनी पाहुण्यांचा परिचय तर मिलिंद कुलकर्णी यांनी संचालन करून आभार मानले.
यावेळी अ.भा.पेशवा संघटनचे पदाधिकारी भास्कर देशपांडे,संतोष वडगावकर,विवेक देशपांडे,सुधाकर विडेकर,प्रकाश देशपांडे,योगेश्वरी वधु -वर सुचक मंडळाचे अध्यक्ष प्रभाकर सेलमुकर,सुभाष देशपांडे,नितीन काटे,मधुसूदन मोरगावकर आदींसह इतर महिला,नागरिक संख्येने उपस्थित होते.