मतमोजणीसाठीचे काउंटडाउन झाले सुरू !

अंबाजोगाई -: केज विधानसभा निवडणुकीची
मतमोजणी शनिवारी (दि. २३) होणार असल्याने त्यासाठीचे काउंटडाउन सुरू झाले आहे. या मतमोजणीसाठीच्या तयारीला प्रशासनाकडून वेग देण्यात आला आहे. गत निवडणुकांच्या तुलनेत यंदा मतदानात वाढ झाल्याने कोण विजयी होणार याबाबत उत्सुकता आहे.
राज्यासह जिल्ह्यातील बहुतांश जागांवरील लढती अत्यंत प्रतिष्ठेच्या आणि अटीतटीच्या झाल्या. त्यामुळे यंदाच्या विधानसभेसाठीचे अंदाज बांधणे अत्यंत मुश्कील झाले आहे. त्यात प्रशासनाकडून कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत मतमोजणी होणार आहे. मतमोजणीच्या वेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये, याची मोठी खबरदारी घेण्यात आली आहे. मतमोजणी सुरू असताना त्याची माहिती निवडणूक आयोगालाही हा निकाल त्वरित कळविण्यात येणार आहे.
मतमोजणीला ड्राय डे-:
मतमोजणीच्या दिवशी अनुचित प्रकार घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे या दिवशी शहर आणि जिल्ह्यातील दारूची सर्व दुकाने बंद ठेवण्याबाबतचे निर्देश आहेत. तसेच मतमोजणी परिसराच्या पाचशे मीटर परिसरात वाहनांना बंदी असणार आहे. मतमोजणी केंद्रात मोबाइल, कॅमेरा किंवा धूम्रपानाला बंदी असणार आहे. मतमोजणीसाठी त्रिस्तरीय सुरक्षा व्यवस्था राहणार आहे.