ताज्या घडामोडी

अखेर आ.नमिता मुंदडा यांच्यामुळे कैकाडी समाजाला मिळाली स्मशानभूमीसाठी १५ गुंठे जागा

आ.नमिताताई मुंदडा यांचे कैकाडी समाजाने मानले आभार

Spread the love

अंबाजोगाई (प्रतिनिधी)
मागील अनेक वर्षांपासून प्रलंबीत असलेला अंबाजोगाईतील कैकाडी समाज स्मशानभूमीचा प्रश्न अखेर आ.सौ.नमिता अक्षय मुंदडा यांच्यामुळे मार्गी लागला आहे. याबाबत अधिकृत माहिती अखिल भारतीय कैकाडी महासंघाचे अंबाजोगाई तालुकाध्यक्ष रमेश कोंडीराम जाधव यांनी दिली आहे. याबद्दल कैकाडी समाजाकडून आ.मुंदडा यांचे जाहीर आभार मानण्यात येत आहेत.

याबाबत अखिल भारतीय कैकाडी महासंघाचे अंबाजोगाई तालुकाध्यक्ष रमेश कोंडीराम जाधव यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना दिलेल्या माहितीनुसार सांगितले की, मागील अनेक वर्षांपासून कैकाडी समाजाच्या स्मशानभूमीचा प्रश्न प्रलंबित होता, ऊन, वारा, पाऊस यांचा सामना करीत कैकाडी समाजातील बांधवांना समाजाच्या ताब्यातील उघड्या व अपुऱ्या जागेवर पिढ्यान् पिढ्या अंत्यविधी करावा लागत होता, या बाबत अखिल भारतीय कैकाडी महासंघाचे अंबाजोगाई तालुकाध्यक्ष रमेश जाधव यांनी कैकाडी समाजातील इतर बांधवांसह सर्वजणांनी मिळून केज विधानसभा मतदारसंघाच्या लोकप्रिय आ.नमिताताई मुंदडा, जेष्ठ समाजसेवक नंदकिशोर मुंदडा, युवा नेते अक्षय मुंदडा यांना प्रत्यक्ष भेटून याप्रश्नी त्यांनी स्वतः लक्ष देण्याची विनंती केली असता, या सर्व मान्यवरांकडून आम्हाला सकारात्मक प्रतिसाद मिळाला. याविषयी कैकाडी समाजाचे युवक कार्यकर्ते तथा मी अखिल भारतीय कैकाडी महासंघाचा अंबाजोगाई तालुकाध्यक्ष रमेश जाधव व समाज बांधवांनी १५ गुंठे जागा उपलब्ध व्हावी यासाठी काकाजींच्या मार्गदर्शनानुसार ११ मार्च २०२४ रोजी अर्ज देवून सदरचा प्रस्ताव तयार करण्यासाठी मुख्याधिकारी, तहसीलदार, उपजिल्हाधिकारी व उप अधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयाकडे सातत्यपूर्ण प्रयत्न व पाठपुरावा केला. तर आ.मुंदडा यांनी ही शासन दरबारी वेळोवेळी हा प्रश्न मांडला आणि सदर प्रस्तावाबाबत सकारात्मक पाठपुरावा करून रेणुकामाता मंदिर रोड जवळील अंबाजोगाई येथील कैकाडी समाजाच्या “स्मशानभूमी” साठी सर्व्हे नंबर ६२१/३ मधील १५ गुंठे जागा शासकीय गायरानातून उपलब्ध करून दिली. अखेर मुंदडा कुटुंबियांनी कैकाडी समाजाला दिलेला शब्द खरा व पुर्ण केला. त्यामुळे अत्यंत आवश्यक असलेल्या कैकाडी समाज स्मशानभूमीचा प्रश्न अखेर मार्गी लावल्याबद्दल कैकाडी समाजाकडून अखिल भारतीय कैकाडी महासंघाचे अंबाजोगाई तालुकाध्यक्ष रमेश जाधव यांनी केज विधानसभा मतदारसंघाच्या लोकप्रिय आ.नमिताताई मुंदडा, जेष्ठ समाजसेवक नंदकिशोर मुंदडा, युवा नेते अक्षय मुंदडा यांचे तसेच शासन, प्रशासन, प्रत्यक्ष – अप्रत्यक्ष सहकार्य करणाऱ्या सर्वांचे जाहीर आभार मानले आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका