ताज्या घडामोडी

पं.उद्धवराव आपेगांवकर यांना ‘समर्पित जीवन गौरव पुरस्कार’ जाहीर

Spread the love

अंबाजोगाई -: येथील आंतरराष्ट्रीय कीर्तीचे पखावज वादक ह.भ.प.श्री.पं.उद्धवराव आपेगांवकर यांना
‘समर्पित जीवन गौरव पुरस्कार’ जाहीर झाला आहे. या पुरस्काराचे वितरण ३ ऑक्टोबर रोजी लोणी काळभोर येथे मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे.
१० व्या विज्ञान, अध्यात्म आणि तत्त्वज्ञानाची जागतिक परिषदेचे औचित्य साधून माईर्स एमआयटी विश्वशांती विद्यापीठ, पुणे, भारत व श्री क्षेत्र आळंदी-देहू परिसर विकास समिती यांच्या संयुक्त विद्यमाने वारकरी संप्रदायातील थोर व जाणकार अशा कीर्तनकार व प्रवचनकारांचा उचित असा सन्मान व गौरव, गुरुवार, दि. ३ ऑक्टोबर २०२४ रोजी सायं. ६.०० वा. विश्वराजबाग, पुणे येथे होणार आहे. या निमित्ताने या पुरस्काराचे वितरण करण्यात येत आहे.
वारकरी संप्रदाय हा महाराष्ट्राच्या जीवनाचा श्वास व ध्यास आहे.आपेगांवकर हे एक अत्यंत जाणकार व निष्ठावंत वारकरी आहेत. पद्मश्री शंकरराव बापू आपेगांवकर व त्यांचे शिष्य म्हणून पं.उद्धवराव आपेगांवकर यांनी पखावज वादणातून ही परंपरा जोपासली आहे. महाराष्ट्राच्या उज्ज्वल अशा ज्ञान-कर्म व भक्तियोगाच्या माध्यमातून ‘ईश्वरदर्शन’ ही भागवत धर्माची परंपरा आपल्या घराण्याने पिढीजात जतन केली. आणि त्याला एक वेगळेच वैभव प्राप्त
करून दिले आहे. वारकरी संप्रदायाची वैभवशाली वैष्णव परंपरा लहानवयापासूनच, भारतीय संस्कृती, परंपरा व भारतीय तत्त्वज्ञानाला अनुसरून, जीवनभर अत्यंत निष्ठेने व श्रद्धेने जोपासली व भागवत धर्म वाढविण्याचे एक महान असे मानव कल्याणाचे पुण्यात्मक धर्मकार्य आपेगावकर घराण्याच्या हातून सदैव घडत आले आहे. वारकरी ‘जीवनमूल्यां’ची जोपासना व वृद्धी, हे जणु आपले जीवन वैशिष्ट्यच आहे. वारकरी संप्रदायासाठी आपल्या घराण्याने संपूर्ण जीवन समर्पित केले आहे. आणि म्हणूनच आपल्या अद्वितीय अशा कार्याची दखल घेऊन, माईर्स एमआयटी विश्वशांती विद्यापीठ, पुणे, भारततर्फे १०व्या ऐतिहासिक अशा विज्ञान, अध्यात्म आणि तत्त्वज्ञानाच्या जागतिक परिषदेचे औचित्य साधून, आपला ‘समर्पित जीवन गौरव पुरस्कार’ देऊन यथोचित सन्मान करण्याचे निश्चित केले असल्याचे संयोजक प्रा.डॉ.श्री.विश्वनाथ कराड,व डॉ विजय भटकर यांनी कळविले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका