कल्याणी तपकिरे ही सरळ सेवा स्पर्धा परीक्षेत महिला गटात राज्यात दुसरी
महावितरणच्या सहाय्यक अभियंता पदासाठी झाली होती स्पर्धा परीक्षा

अंबाजोगाई-: येथील कल्याणी शिवाजीराव तपकिरे ही विद्यार्थिनी महावितरणच्या वतीने घेण्यात आलेल्या सहाय्यक अभियंता पदासाठी झालेल्या
सरळ सेवा स्पर्धा परीक्षेत महाराष्ट्रात महिला गटात दुसरी आली आहे.
सप्टेंबर २०२३- २०२४ मध्ये महावितरणच्या वतीने सहाय्यक अभियंता पदासाठी सरळ सेवा भरती स्पर्धा परीक्षा घेण्यात आली.
येथील बंकटगल्ली तील रहिवासी असलेल्या
कल्याणी शिवाजीराव तपकिरे हिने ही परीक्षा दिली. या परीक्षेत ती महिला गटात महाराष्ट्रात दुसरी आली. तिचे शालेय व पॉलिटेक्निकचे शिक्षण अंबाजोगाई येथेच झाले. बी.ई . इलेक्ट्रिकलचां अभियांत्रिकी पदवी तिने पुणे येथे मिळविली. शिक्षणानंतर खाजगी कंपनीत काम करत तिने स्पर्धा परीक्षेचा अभ्यास केला. व या परीक्षेत ती राज्यात दुसरी आली. तिचे वडील सामान्य शेतकरी आहेत. मात्र अंगी जिद्द व कठोर मेहनतहो केल्यास परिस्थिती आडवी येत नाही याचा आदर्श कल्याणी हिने युवकांसमोर ठेवला आहे. कल्याणी हिची निवड झाल्या बद्दल आधार माणुसकीचा चे अध्यक्ष ॲड. संतोष पवार, सामाजिक कार्यकर्ते परमेश्वर भिसे,भारत मुळे पाटील,अंगदराव हावळे, तानाजी तपकिरे,प्रद्युम्य तपकिरे यांनी तिचे स्वागत केले.