अंबाजोगाई येथे कडकडीत बंद

अंबाजोगाई -:
मसाजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ अंबाजोगाई शहर व तालुक्यात शुक्रवारी कडकडीत बंद पाळण्यात आला . सकल मराठा समाज बांधवांच्या वतीने बंदची हाक देण्यात आली होती.
आज च्या या बंद मध्ये शहरातील विविध व्यवसाय,दुकाने, शाळा, महाविद्यालय बंद ठेवण्यात आले होते. शहरातील व्यापाऱ्यांनी व शालेय शिक्षण संस्थांनी बंद पाळून पुकारण्यात आलेल्या शहर बंदच्या आवाहनाला प्रतिसाद दिला. आठवडी बाजारावरही मोठ्या प्रमाणावर परिणाम झाला. अनेक शेतकऱ्यांनी व व्यापाऱ्यांनी आठवडी बाजारास येण्याचे टाळले. शहरात बंद पाळण्यात यावा यासाठी सकल मराठा समाज बांधवांच्या वतीने दोन दिवसापासून आवाहन करण्यात येत होते. शुक्रवारी सकाळी आठ वाजल्यापासून शहरा मधून रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. दरम्यान पुकारलेला बंद शांततेत पार पडला.