ताज्या घडामोडी
श्रीराम माध्यमिक विद्यालयाचे यश

अंबाजोगाई (प्रतिनिधी): जिल्हा क्रीडा कार्यालयाने तालुकास्तरीय शालेय मैदानी स्पर्धा अंबाजोगाई येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाच्या प्रांगणात पार पडल्या.
भारज येथील श्रीराम माध्यमिक विद्यालयाचा विद्यार्थी रुद्र महेश धुमाळ याने १४ वयोगटात तालुकास्तरीय गोळा फेक स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक पटकाविला. श्रावणी सचिन रोडे (१०० मीटर धावणे) द्वितीय क्रमांक पटकाविला.
शिक्षक तानाजी गायकवाड यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. दोन्ही विद्यार्थ्यांची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. लालबहादूर शास्त्री शिक्षण प्रसारक मंडळाच्या अध्यक्षा कमलबाई शिंदे, सचिव दशरथ शिंदे, संचालक मंडळाने मुख्याध्यापिका नीलप्रभा ढाणे यांनी मार्गदर्शक शिक्षक व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
——–
