स्व. प्रेमचंदजी कुंकुलोळ ट्रस्टच्या वतीने आराध्याना फराळाचे वाटप

अंबाजोगाई -: येथील स्व. प्रेमचंदजी कुंकुलोळ चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने श्री. योगेश्वरी देवीच्या पालखीत सहभागी झालेल्या आराध्याना फराळाचे वाटप करण्यात आले. गेल्या २० वर्षा पासून उद्योजक रसिक कुंकुलोळ व संतोष कुंकुलोळ हा उपक्रम राबवित आहेत.
येथील प्रसिद्ध व्यापारी स्व. प्रेमचंद कुंकुलोळ यांच्या स्मृती प्रित्यर्थ गेल्या २० वर्षा पासून आराधी महिला व भक्तांसाठी हा उपक्रम सातत्याने राबविला जात आहे.
शनिवारी सायंकाळी श्री.योगेश्वरी देवीच्या पालखीचे आगमन रविवार पेठेत झाले. यावेळी स्व. प्रेमचंदजी कुंकुलोळ ट्रस्ट, रविवारपेठ मित्रमंडळ यांच्या वतीने आराधी महिला व पुरुषांना फराळाचे वाटप करण्यात आले. यावेळी
रसिक कुंकूलोळ, संतोष कुंकूलोळ, संतोष दहातोंडे, बालासाहेब हरेगावकर, प्रथमेश कुंकुलोळ, आनंद टाकळकर,राहुल पेडगावकर,सतीश दहातोंडे,प्रशांत शेलमुक्र, प्रवीण
शेलमुकर, सचिन भातलवंडे,किरण शेलमुकर, महेश नाईक,श्रीनिवास नाईक, वरद मुडेगावकर,वरद दहातोंडे, धनराज सोळंकी,सहील मुथा,यश बडेरा, ज्ञानेश्वर पाटील,काशिनाथ सातपुते,यांच्यासह भारतीय जैन संघटनेचे पदाधिकारी,रविवार पेठ मित्रमंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते.