स्वामी विवेकानंद शाळेत विद्यार्थ्यांनी घेतले लष्करी शिक्षण, स्वयंशिस्ती चे धडे
विद्यार्थ्यांनी घेतली सैनिक विशाल राठोड यांची मुलाखत

आंबजोगाई :-
स्वामी विवेकानंद बाल विद्या मंदिर राधानगरी अंबाजोगाई येथे मुलांना सैन्याविषयी तसेच लष्करी शिक्षणाविषयी व स्वयंशिस्तीविषयी मार्गदर्शन करण्यासाठी आर्मी सैनिक विशाल सर्जेराव राठोड यांची मुलाखत घेण्यात आली.
विशाल सर्जेराव राठोड यांची नियुक्ती जी डी सोल्जर,११२ युनिट, इंजिनियर रेजिमेंट, मध्ये झालेली असून सध्या ते यूपी मथुरा या ठिकाणी कार्यरत आहेत.
या मुलाखत कार्यक्रम प्रसंगी अध्यक्ष म्हणून संतोष कुलकर्णी (अध्यक्ष-न. ब. सं. अंबाजोगाई ) स्वरूपा दिग्रसकर ( सचिव-न. ब. सं. अंबाजोगाई तसेच मुख्याध्यापिका स्वा. वि. बा. वि. मं. अंबाजोगाई.) तसेच प्रमुख अतिथी म्हणून सैनिक विशाल राठोड इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात प्रतिमा पूजन व पाहुण्यांच्या रीतसर स्वागताने करण्यात आली. या मुलाखत कार्यक्रमाचा उद्देश आदरणीय संतोष यांनी आपल्या समर्पक शब्दांत मांडत लष्करी शिक्षण व शिस्तीची जाणीव मुलांना करून दिली.
कार्यक्रम प्रसंगी विशाल राठोड यांची मुलाखत शाळेतील सहशिक्षिका प्रज्ञा महाजन यांनी घेत मुलांचे जागृत केले तसेच मुलांनीही आपले जिज्ञासापूर्वक प्रश्न विचारले. मुलांच्या प्रश्नांना उत्तरे देत असताना सैनिक राठोड यांनी आपला जीवन परिचय तसेच आपले शालेय माध्यमिक व महाविद्यालयीन शिक्षण याविषयी माहिती करून दिली व आपल्या शिक्षणातील एनसीसी चे महत्व मुलांना सांगितले. त्याचबरोबर भारतीय लष्कराची माहिती,लष्करातील सैनिकांच्या विविध तुकड्या व त्यांची कामे, अनेक राज्यांतील सैनिकांचे एकमेकांशी असणारे संबंध यांविषयी माहिती दिली.
कार्यक्रमाचे संचालन इयत्ता नववीची विद्यार्थिनी ऐश्वर्या गडदे तसेच इयत्ता सातवीचा विद्यार्थी चिरंजीव मिहीर देशपांडे यांनी केले व कार्यक्रमाचे आभार शाळेच्या सहशिक्षिका अंकिता कुलकर्णी यांनी केले.
अशाप्रकारे स्वामी विवेकानंद बाल विद्या मंदिर अंबाजोगाई येथे मुलाखतीचा कार्यक्रम अतिशय उत्साह पूर्ण वातावरणात संपन्न झाला.