मधुमेह उपचाराने बरा होतो – डॉ.अतुल शिंदे
योगेश्वरी महाविद्यालयात ३५० जणांची झाली मधुमेह तपासणी

अंबाजोगाई -: मधुमेह उपचाराने पूर्णतः बरा होतो.मात्र यासाठी खबरदारी घेऊन आहार व व्यायाम नियमित केला पाहिजे. असा सल्ला येथील प्रसिद्ध मधुमेह तज्ञ डॉ अतुल शिंदे यांनी दिला.
रोटरी क्लब ऑफ आंबेजोगाई सिटी
व योगेश्वरी डायबिटीज केअर सेंटर,आय.एम.ए.
यांच्या संयुक्त विद्यमानाने सोमवारी योगेश्वरी महाविद्यालयामध्ये
मधुमेह चाचणी चे शिबिर
आयोजित करण्यात आले होते.यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना डॉ अतुल शिंदे बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर योगेश्वरी शिक्षण संस्थेचे पदाधिकारी कमलाकरराव चौसाळकर,अंगद कराड,सुहास काटे, रोटरीचे अध्यक्ष कल्याण काळे सचिव धनराज सोळंकी,प्रकल्प संचालक डॉ.अतुल शिंदे,रुपेश रामावत,सचिन बेंबडे, महाविद्यालयाचे उपप्राचार्य अजय पाठक उपस्थित होते.
या वेळी ३५० जणांची मधुमेह तपासणी करण्यात आली. यात ५० जणांना मधुमेह असल्याचे निष्पन्न झाले. या वेळी डॉ.अतुल शिंदे यांनी समुपदेशन व मार्गदर्शन केले.