शिक्षकांनी समर्पित होऊन सेवा द्यावी – उपकुलपती डॉ. जोगेंद्रसिंह बिसेन

अंबाजोगाई -: व्यवस्था बदलण्यासाठी आधी मातीत रुजावे लागते.समर्पित व्हावे लागते.हे कार्य शिक्षकच करू शकतात. शिक्षकांच्या माध्यमातूनच राष्ट्र पुन्हा गतवैभव प्राप्त करील. असे प्रतिपादन यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे उप कुलपती डॉ. जोगेंद्रसिंह बिसेन यांनी केले.
रोटरी क्लब ऑफ अंबाजोगाई सिटी यांच्या वतीने येथील विलासराव देशमुख सभागृहात सोमवारी
शिक्षकांना राष्ट्राचे शिल्पकार या पुरस्कार वितरण समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे उप कुलपती डॉ. जोगेंद्रसिंह बिसेन बोलत होते.तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रोटरीचे उपप्रांतपाल मेघराज बरबडे होते.तर व्यासपीठावर रोटरीचे अध्यक्ष कल्याण काळे, सचिव धनराज सोळंकी,प्रकल्प संचालक डॉ निशिकांत पाचेगावकर, सह संचालक स्वरुपा कुलकर्णी यांची उपस्थिती होती.
यावेळी आठ शिक्षकांना राष्ट्राचे शिल्पकार या पुरस्काराने उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमास प्रारंभ झाला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ निशिकांत पाचेगावकर यांनी केले. संचलन प्रा. रमेश सोनवळकर यांनी तर उपस्थितांचे आभार धनराज सोळंकी यांनी मानले.
यांचा झाला सन्मान -:
मधुकर जाधव (खोलेश्वर माध्यमिक विद्यालय ),तीलोत्तमा इंगोले (योगेश्वरी नूतन विद्यालय ),सविता जाधव( सोमेश्वर विद्यालय घाटनांदुर),अतिकोद्दिन सय्यद (डॉ मोहम्मद इकबाल विद्यालय),भाग्यश्री गाढवे(व्यंकटेश विद्या मंदिर),सुरेखा रणखांब( विवेकानंद बाल विद्या मंदि),प्रवीण महामुनी (न्यू विजन पब्लिक स्कूल),श्रीकृष्ण जिरे (सिनर्जी नॅशनल स्कूल) यांना फेटा,शाल,श्रीफळ व सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.