ताज्या घडामोडी
याज्ञसेनी पाठक हीस उत्कृष्ट अभिनयाबद्दल पारितोषिक

अंबाजोगाई | प्रतिनिधी
बीड येथे पार पडलेल्या त्रेसष्ठाव्या हौशी राज्य नाट्य स्पर्धेत अंबाजोगाई येथील याज्ञसेनी सचिन पाठक हीने उत्कृष्ट अभिनय सादर करून पारितोषिक पटकावले आहे.
यशोदीप सेवाभावी बहुउद्देशीय संस्था, अंबाजोगाई, योगेश सोमण लिखित अचानक हे नाटक महेश सबनीस दिग्दर्शित बीड येथे दिनांक ७ डिसेंबर रोजी पार पडले.
मिलिंद मुकदम ,रूपाली मुकदम याज्ञसेनी पाठक , संकेत तोरंबेकर , उपेंद्र जोशी या कलावंतांनी सादर केलेल्या नाटकामध्ये उत्तम भुमिका बजावली होती.या स्पर्धेत याज्ञसेनी पाठक हीने उत्कृष्ट अभिनय सादर करून पारितोषिक पटकावले आहे. याज्ञसेनी पाठक ही प्रथमच रंगमंचावर आलेली आहे. याज्ञसेनी पाठक , दिग्दर्शक महेश सबनीस व सर्व कलावंताचे अभिनंदन करण्यात येत आहे.