मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली मुख्यमंत्री पदाची जबाबदारी

मुंबई(प्रतिनिधी) महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री म्हणून आज सायंकाळी साडेपाच वाजता देवेंद्र सरिता गंगाधरराव फडणवीस यांनी पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली, त्यांच्या सोबत एकनाथराव शिंदे आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री म्हणून पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली या तिघांनाही राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन यांनी शपथ दिली.यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह,सडक परिवहन मंत्री नितीन गडकरी,अर्थमंत्री निर्मला सीतारामन,शिवराजसिंह चौहान, आदिरादित्य शिंधिया,पियुषकुमार गोयल, भाजपा अध्यक्ष जे.पी.नड्डा, योगी आदित्यनाथ, नितीशकुमार, चंद्राबाबू नायडू,मोहनलाल यादव,भजनलाल शर्मा,प्रमोद सावंत,हेमंत बिस्वा शर्मा, पुष्करसिंह धामी,भुपेंद्र पटेल हे विविध राज्याचे मुख्यमंत्री,मुकेश अंबानी,गौतम अदानी, सचिन तेंडुलकर, शाहरुख खान, सलमान खान,रणबीर कपूर, खान,संजय दत्त, माधुरी दीक्षित,या मान्यवरांसह संतमहंत राज्यातील 40 हजार पेक्षा अधिक नागरिक उपस्थिती होते