अंबासाखर कारखान्याला गतवैभव मिळवून देऊ – रमेश आडसकर
अंबाजोगाई सहकारी साखर कारखान्याच्या ४७ व्या वार्षिक सर्वसाधारण सभा

अंबाजोगाई-: अंबासाखर कारखान्याला गतवैभव मिळवून देऊ असे प्रतिपादन अंबाजोगाई साखर कारखान्याचे अध्यक्ष रमेश आडसकर यांनी केले.
येथील अंबाजोगाई सहकारी साखर कारखाना लि.अबांसाखरची ४७ वी वार्षिक सर्वसाधारण सभा कारखान्याच्या प्रांगणात सोमवारी झाली. यावेळी बोलताना चेअरमन रमेशराव आडसकर यांनी अंबासाखर कारखान्याला गतवैभव मिळवून देण्यासाठी संचालक मंडळ प्रयत्नशील आहे. हा कारखाना चांगल्या पद्धतीने चालविण्याचा प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.प्रारंभी अहवाल वर्षातील दिवंगतांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यानंतर अहवालाचे वाचन करण्यात आले, त्यास उपस्थित सभासदांनी टाळ्यांच्या गजरात मंजुरी दिली. यावेळी सर्वसाधारण सभेचे अध्यक्ष म्हणून बोलताना चेअरमन रमेशराव आडसकर म्हणाले की, आपल्या कारखान्याच्या ४७ व्या वार्षीक सर्वसाधारण सभेस सर्वजण उपस्थित राहिलात या बद्दल संचालक मंडळाचे वतीने मी सर्वांचे हार्दीक स्वागत करून दिनांक १ एप्रिल २०२३ ते ३१ मार्च २०२४ अखेर संपलेल्या आर्थिक वर्षाचा कारखान्याच्या कामकाजाचा वार्षीक अहवाल व ताळेबंद पत्रक नफा-तोटा पत्रक तसेच सन २०२३-२०२४ वर्षाचा अर्थसंकल्प इत्यादी आपल्यासमोर सादर करीत आहे. अहवाल काळात कारखाना बंद होता व तो भाडे तत्वावर मे.व्यंकटेश इंडस्ट्रीज लि.परळी- वैजनाथ यांना चालविण्यास दिला होता. परंतु, त्यांनी सदर कारखाना भाडे तत्वावर चालविण्यास आमची कंपनी असमर्थ आहे असे लेखी कळविले आहे. यामुळे सध्याच्या विद्यमान संचालक मंडळाने राज्य शासन, केंद्र शासनाकडे पाठपुरावा करून हा कारखाना चालु करणे करीता मार्जीन मनी खेळते भांडवल ८० कोटी रूपये मंजुर करून घेणे बाबत परिश्रम घेतले व शासन निर्णयाप्रमाणे आपल्या कारखान्यास मंजुर करण्यात आले आहेत.
प्रारंभी उपाध्यक्ष दत्तात्रय पाटील यांनी अंबाजोगाई सहकारी साखर कारखाना सचोटीने, चांगल्या पद्धतीने चालविण्यासाठी संचालक मंडळ तयार आहे. मांजरा धरण भरल्याने पुढील दोन-तीन वर्षे ऊस कमी पडणार नाही.असे सांगितले.सभेच्या सुरूवातीला कार्यकारी संचालक डी.एन.मरकड यांनी नोटिस वाचन केले. या वेळी अंबाजोगाई सहकारी साखर कारखान्याचे संचालक ऍड.प्रमोद जाधव, ऋषिकेश आडसकर, संभाजी इंगळे, लक्ष्मीकांत लाड, अशोक गायकवाड, गोविंद देशमुख, राजाभाऊ औताडे, विजय शिनगारे, बाळासाहेब सोळंके, मधुकर शेरेकर, अनिल किर्दंत, जिवन कदम, लालासाहेब जगताप, अनंत कातळे, विठ्ठल देशमुख, शशिकांत लोमटे, मिनाज युसुफखाॅं पठाण, रमाकांत पिंगळे, भागिरथी साखरे, वच्छलाबाई शिंदे, प्रभारी कार्यकारी संचालक एस.बी.साखरे, कार्यकारी संचालक दत्तात्रय मरकड यांच्यासह केज कृ.उ.बा.समितीचे सभापती अंकुशराव इंगळे, अंबाजोगाई कृ उ.बा.समितीचे माजी सभापती विलासराव सोनवणे, धारूर कृ उ.बा.समितीचे उपसभापती सुनील शिनगारे, लातूर जिल्हा परिषदेचे माजी सदस्य साहेबराव पवार, उध्दवराव इंगोले, अजय पाटील, शिवाजीराव मायकर, रमेश नखाते, धारूर पंचायत समितीचे माजी सभापती विलास खुळे, बालासाहेब इंगळे, रामकिसन खोडसे, शिंदे , बाळासाहेब देशमुख, अनिल माचवे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
