जयकिसान विद्यालयाच्या संगीत मंचची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड

अंबाजोगाई/प्रतिनिधी: माध्यमिक व उच्च माध्यमिक स्तरावली विद्यार्थ्यांसाठी आयोजीत करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय कला उत्सव स्पर्धेतील समूह गायन या प्रकारात तालुक्यातील आपेगाव येथील जयकिसान माध्यमिक विद्यालयाच्या मुलीच्या संघाने जिल्हात प्रथम क्रमांक मिळवला आहे. यामुळे त्यांची निवड पुणे येथे होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी झाली आहे. यामुळे शाळेचे सर्वस्तरातून अभिनंदन होत आहे.
तालुक्यातील आपेगाव येथील जयकिसान माध्यमिक विद्यालयाचा संगीत मंच नेहमी अग्रेसर असतो. अंबाजोगाई येथील जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेत आयोजीत करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय समूह गीत गायन स्पर्धेत जयकिसान विद्यालयाच्या मुलींच्या संघाने बाजी मारत जिल्हात प्रथम क्रमांक मिळवीला आहे. यामुळे या संघाची निवड पुणे येथे १६ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी झाली आहे. या संघात अम्रता बालाजी पांढरे, वैष्णवी बिरु कोकाटे, समिक्षा रमेश शितोळे, सायली संजय तट, आकांक्षा गोपाल कांबळे व पल्लवी नारायण वाघमारे या विद्यार्थीनींचा समावेश होतो. यशस्वी संघास शाळेचे संगीत शिक्षक तालमणी बी. एन. मुर्के यांनी मार्गदर्शन केले. समूह गीत गायन स्पर्धेत संघाने मिळवीलेल्या यशाबद्दल संस्थेच सचिव प्रा. जयजित शिंदे, सहसचिव सौ. व्हि. जे. शिंदे, मुख्याध्यापक तथा प्राचार्य प्रा. एन. के. हजारे, प्रा. पी. एस. तरकसे, वर्गशिक्षक एस. व्ही. देशमुख, एस. एन. घुले यांच्यासह सर्व शिक्षकांनी अभिनंदन व कौतूक केले आहे.
