जिल्हास्तरीय मैदानी स्पर्धेत प्रियल कराड व अमृता पुडालेचे यश
(खोलेश्वलरच्या विद्यार्थीनी विभागीय स्पर्धेत करणार जिल्ह्याचे नेतृत्व..)

अंबाजोगाई (प्रतिनिधी) :- दि. ०५/१०/२०२४ रोजी बीड येथे पार पडलेल्या जिल्हास्तरीय मैदानी क्रीडा स्पर्धेत १७ वर्ष वयोगटात खोलेश्वर माध्यमिक विद्यालयाच्या प्रियल कराड १०० मीटर धावणे प्रथम,अमृता पुडाले हातोडा फेक द्वितीय क्रमांक पटकावला असून या दोघींचीही संभाजीनगर येथे होणा-या विभागीय मैदानी स्पर्धेसाठी निवड झाली आहे. या स्पर्धेकांना विद्यालयातील क्रीडा शिक्षक सतीश बलुतकर,कल्पना जवळगांवकर यांचे मार्गदर्शन लाभले.
विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल त्यांचे अभिनंदन भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेचे अध्यक्ष डॉ सुरेंद्र आलुरकर,
कार्यवाह डॉ.हेमंत वैद्य,मुख्य
प्रशासकीय अधिकारी चंद्रकांत मुळे,शहरातील सर्व केंद्रीय कार्यकारिणी सदस्य,स्थानिक समन्वय
समितीचे अध्यक्ष विजयराव
वालवडकर,स्थानिक समन्वय समितीचे कार्यवाह किरण कोदरकर, माध्यमिक शालेय समितीचे अध्यक्ष डॉ अतुल देशपांडे, मुख्याध्यापक तथा केंद्रीय कार्यकारिणी सदस्य बाबुराव आडे, शालेय समितीचे सर्व सदस्य, उपमुख्याध्यापक माधव जोशी, पर्यवेक्षक सुर्यकांत उजगरे,पर्यवेक्षक प्रशांत पिंपळे तसेच सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले आहे.
